Monday, December 31, 2018

अंगूरी भाभीने नृत्‍याच्‍या माध्‍यमातून दिग्‍गज अभिनेत्री श्रीदेवीला वाहिली श्रद्धांजली 
सर्वजण अगदी जल्‍लोषात नववर्षाचे स्‍वागत करतात. काहीजण बाहेर जाऊन इतरांसोबत आनंद साजरा करतात, तर काहीजणांना आपल्‍या मित्र-परिवारांसोबत घरामध्‍येच त्‍यांच्‍या आवडीचे कार्यक्रम बघत आनंद साजरा करायला आवडते. यंदाच्‍या नववर्ष स्‍वागतादरम्‍यान तुमच्‍या आवडत्‍या व्‍यक्‍तींना बोलवा आणि टीव्‍हीचा रिमोट दूर ठेवा. &TV चॅनेल सादर करत आहे एक मनोरंजनपूर्ण सायंकाळ 'शाम शानदार'. हा कार्यक्रम तुमच्‍यासाठी मौजमजेने व सिता-यांनी भरलेल्‍या न्‍यू इअर पार्टीचा आनंद घेऊन येत आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार काही लोकप्रिय गाण्‍यांवर विविध अॅक्‍ट्स सादर करणार आहेत. तसेच विविध कलाकार काही मनोरंजनपूर्ण परफॉर्मन्‍स सादर करणार आहेत.
सर्वांमध्‍ये चर्चा होत असलेली कलाकार म्‍हणजे आपली लाडकी शुभांगी अत्रे. &TV वरील मालिका 'भाभीजी घर पर है'मधील गोड व साधीभोळी अंगूरी भाभी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या शुभांगीचा &TVचा कार्यक्रम 'शाम शानदार''च्‍या मंचावरील परफॉर्मन्‍स शानदार असणार आहे. ती आयकॉनिक व दिग्‍गज अभिनेत्री स्‍वर्गीय ''श्रीदेवी''यांना श्रद्धांजली वाहणार आहे. या दिग्‍गज अभिनेत्रीच्‍या काही लोकप्रिय गाण्‍यांवरील परफॉर्मन्‍ससह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करत शुभांगी 'तेरे मेरे होठो पे', 'काटे नही कटते', 'मोरनी बाघा मा' आणि 'मेरे हाथो में नौ नौ चुडियॉं' अशा लोकप्रिय गाण्‍यांवर थिरकताना दिसणार आहे. शुभांगीला बॉलिवुडची चांदनी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्‍याची संधी मिळाल्‍याने अत्‍यंत आनंद झाला आहे.  
आनंद होण्‍यासोबतच परफॉर्म करण्‍यासाठी काहीशी नर्वस असलेली शुभांगी म्‍हणाली, ''हिंदी चित्रपटसृष्‍टीतील सर्वात आयकॉनिक व दिग्‍गज अभिनेत्री श्रीदेवीजींना मानवंदना वाहण्‍यासोबतच त्‍यांच्‍या गाण्‍यांवर परफॉर्म करण्‍याची संधी मिळाल्‍याने मला खूपच आनंद झाला आहे. मी त्‍यांचा अभिनय पाहत आणि त्‍यांच्‍या कामातून प्रेरणा घेत मोठी झाली आहे. त्‍या सौंदर्यवती असण्‍यासोबतच एक उत्‍तम कलाकार व परफॉर्मर आहेत. त्‍यांना मानवंदना देण्‍याची संधी मिळाल्‍याने मला खूप आनंद होत आहे. मी त्‍यांना मानवंदना वाहण्‍यासाठी अत्‍यंत उत्‍सुक आहे. मी आशा करते की, प्रेक्षक आणि चाहत्‍यांना माझा परफॉर्मन्‍स आवडेल.''
अंगूरी भाभीसाठी निश्चितच ती शानदार शाम असणार आहे. या कार्यक्रमामध्‍ये अभिनेत्री विविध रंगाच्‍या साड्यांमध्‍ये दिग्‍गज अभिनेत्रीच्‍या क्‍लासिक गाण्‍यांवर परफॉर्म करताना दिसणार आहे.
अधिक जाणण्‍यासाठी पाहा 'शाम शानदार' २९ व ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता फक्‍त &TV वर




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...