Saturday, December 8, 2018


टाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची 'सोनी मराठी' वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू

१९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या सोनी मराठीया मनोरंजनाच्या वाहिनीने आपल्या हलक्या-फुलक्या, गमतीशीर, प्रेमळ मालिकेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा केली आहे. केवळ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन न करता सोनी मराठी वाहिनी लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर देखील आयोजित करत आहेत.

हम बने तुम बने सारखा कौटुंबिक, प्रेक्षकांना टेन्शन विसरून हसायला लावणारा महाराष्ट्राची हस्यजत्रा, तर छोट्या उस्तादांना ताल थिरकायला लावणारा सुपर डान्सर महाराष्ट्र यांसारखे अनेक सोनी मराठीवरील कार्यक्रम मध्यंतरी काही कारणास्तव टाटा स्कायच्या ग्राहकांना पाहता आले नाही. याविषयी प्रेक्षकांनी जरी खंत व्यक्त केली असली तरी ही वाहिनी पाहायला मिळावी यासाठी प्रेक्षकांनी टाटा स्कायकडे मागणी केली होती. 

प्रेक्षकांच्या सततच्या मागणीमुळे आता टाटा स्कायवर चॅनेल नंबर #१२२० वर ही वाहिनी आता उपलब्ध करण्यात आली आहे. नुकतेच लाँच झालेल्या सोनी मराठीवर कौटुंबिक मालिका, कॉमेडी शो, रिऍलिटी शो चालू आहेत आणि टाटा स्कायवर सोनी उपलब्ध नसल्यामुळे मराठी प्रेक्षक वर्गाला हे मनोरंजक कार्यक्रम पाहायला मिळाले नाही. प्रेक्षक हे मायबाप आहेत आणि सोनी मराठीने प्रेक्षकांना कार्यक्रमातून जो विषय प्रेक्षकांना दिला आहे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यामुळेच प्रेक्षकांची या वाहिनीसाठी असलेली आवड लक्षात घेता, टाटा स्कायने त्यांच्या चॅनेल लिस्टमध्ये खास प्रेक्षकांसाठी चॅनेल नंबर #१२२० वर ही वाहिनी उपलब्ध केली. एकंदरीत, काय तर... ही वाहिनी मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी आपले प्रयत्न चालू ठेवले होते आणि आता टाटा स्कायवर आपण ही सोनी मराठी वाहिनी पाहू शकतो हा खरं तर प्रेक्षक वर्गाचा विजय आहे.

तसेच सोनी मराठी वाहिनीकडून मनोरंजन चालू ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी टाटा स्कायला केलेल्या सततच्या मागणीवरून सोनी मराठीची लोकप्रियता आणि मराठी प्रेक्षकांकडून या वहिनीला मिळालेले सर्वप्रथम प्राधान्य हे पुन्हा एकदा दिसून आले.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...