Tuesday, December 25, 2018


*सचिनजी यांच्या ‘अशी ही आशिकी’च्या टीझर लाँच सोहळ्यात उलगडले ‘लिडींग लेडी’चे सिक्रेट* 

पूर्वी प्रेम कनफेस करण्यासाठी फूल आणि सोबतीला प्रेमाचे दोन शब्द पुरेसे होते... पण आताची जनरेशन ही जरा एक स्टेप पुढे असल्यामुळे आता कनफेशनचं कनफ्युझन आणि इमोशनचं कमोशन झालंय. प्रेम जरी एवढं कॉम्पलिकेटेड बनलं असलं तरी प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या एका नवीन जोडीची आशिकी ही जरा वेगळीच आहे. आशिकीची एक वेगळी कथा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

गुलशन कुमार प्रस्तुत आणि टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित ‘अशी ही आशिकी’चे पहिले टीझर नुकतेच मुंबई येथील ऑर्किड हॉटेल येथे लॉंच करण्यात आले. टी-सिरीज निर्मित करत असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे निर्माते आहेत. या टीझर लाँचिग सोहळ्याचे आणखी एक स्पेशल बात म्हणजे ‘या चित्रपटाची हिरोईन कोण?’ हा प्रश्न जो इतके दिवस गुलदस्त्यात होता त्याचे उत्तर आता मिळाले आहे. सचिनजी यांच्या ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी दिसणार आहे. या नवीन जोडीमध्ये फुलणारी आशिकी पाहणे, प्रेक्षकांसाठी न्यु इयरचं स्पेशल गिफ्ट असेल.

फ्रि-मांइडेड असलेले हे कपल आणि त्यांची लव्हस्टोरी ही किती इंटरेस्टिंग आणि सध्याच्या जनरेशनला रिलेट करणारी आहे याचा अंदाच टीझरमधून येतो. अभिनयने या चित्रपटात ‘स्वयम’ आणि हेमलने ‘अमरजा’ नावाचे पात्र साकारले आहे. नवीन जोडी, ऐकायला मिळणारी नवीन नावं आणि एकंदरीत संपूर्ण टीझर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरलाय.

चित्रपटाचे टायटल, हिरो-हिरोईनची जोडी, चित्रपटाची झलक, लोकेशन्स इत्यादी गोष्टींमुळे ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. ‘अशी ही आशिकी’ची तितक्याच दर्जेची कथा-पटकथा आणि संवाद असणार कारण सचिनजी यांनी स्वत: ही जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे कथा-संवाद यांचा दर्जा प्रत्येकाला पटेल,रुचेल असाच असणार.

स्वयम आणि अमरजाची  ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंनटाईन्स डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA DAY’ कारण ‘अशी ही आशिकी’ १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.








No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...