Saturday, December 8, 2018

माधुरीच्या पूर्ण झालेल्या बकेट लिस्ट चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर
सोनी मराठीवर पहा माधुरीची पूर्ण झालेली बकेट लिस्ट

माधुरी... प्रत्येक मराठी माणसाला भावणारं हास्य... कित्येक वर्ष आपल्या अदांनी जगभरातील चाहत्यांना घायाळ करणारी ही माधुरी कधीतरी आपल्या मराठी चित्रपटात झळकावीही प्रत्येक मराठी मनाची इच्छा... आपल्या चाहत्यांचं मन ओळखून या हास्यसम्राज्ञीने गेल्या संक्रातीला गोड बातमी दिली आणि ती म्हणजे आपल्या मराठी चित्रपटाची... हा चित्रपट म्हणजे... ‘बकेट लिस्ट

माधुरी दिक्षित या हास्यसम्राज्ञीचा पहिलावहिला मराठी चित्रपट,धर्मा प्रोडक्शन्सचं मराठी चित्रपटासृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल, रणबीर कपूरची मराठी चित्रपटात दिसलेली पहिली झलक तर प्रदर्शनापूर्वीच हाऊसफुल्ल झालेला पहिला मराठी सिनेमा... या आणि अशा कित्येक विशेषणांनी समृध्द ‘बकेट लिस्ट’ आता पहिल्यांदा टेलिव्हिजनवर एंट्री मारणार आहे ते म्हणजे ‘सोनी मराठीच्या माध्यमातून… या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या 16 डिसेंबरला सोनी मराठीवर पाहता येणार आहेआपल्या प्रेक्षकांसोबत अतूट नातं विणणाऱ्या सोनी मराठीने नेहमीच आपलं वेगळेपण जपलं आहे. या वाहिनीवर सध्या सुरू असणऱ्या मालिका असतील, त्यात काम करणारी कलाकार मंडळी असतील किंवा त्यावर दाखवले जाणारे चित्रपट ही प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट असावी याकडे सोनी मराठीच्या टीमचा कल असतो.

याच जाणीवेतून सोनी मराठी माधुरीची ‘बकेट लिस्टपहिल्यांदा टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीचा जादुई मंत्रा महाराष्ट्राची धक धक गर्ल माधुरी, ‘बकेट लिस्ट’ च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी घेऊन आली होती. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींची एक यादी केली तर त्या पूर्ण करणं सोपं जातं. या छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद खूप मोठा असतो ज्याने आयुष्य समृध्द होतं जातं... हा संदेश देणारी बकेट लिस्ट प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. जगण्याची भाषा बदलून आपलं आयुष्य जगतानाआपल्या आनंदाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही गोष्ट दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी या चित्रपटातून अगदी अचूक मांडली आहे.

विनोदाची झालर असणाऱ्या या चित्रपटात माधुरीबरोबरच सुमित राघवनरेणुका शहाणेवंदना गुप्तेप्रदिप वेलणकरदिलीप प्रभावळकरइला भाटेशुभा खोटे आणि रेशम टिपणीस या कलाकारांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. या सगळ्यांच्याच अभिनयाची ही गोड-तिखट मिसळ तुम्ही नव्याने अनुभवू शकणार आहात सोनी मराठीवर, 16 डिसेंबर ला होणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्ताने... तेव्हा या प्रिमियरला तुमची हजेरी नक्की असू द्या.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...