Monday, December 31, 2018


आदित्य नारायण बेली डान्स करून कत्रिना कैफचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा…

आपल्या ‘झीरो’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी शाहरूख खान, कत्रिना कैफ आणि अनुष्का शर्मा झाले ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’मध्ये सहभागी
दिवसागणिक तीव्र होत चाललेल्या स्पर्धेमुळे ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या गाण्याच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमातील सर्व स्पर्धक आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. परीक्षकांवर आपली छाप पाडण्यासाठी हे स्पर्धक आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करीत आहेत. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान प्राप्त करण्यासाठी अंतिम पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता आपल्या आपल्या ‘झीरो’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आपल्या कत्रिना कैफ आणि अनुष्का शर्मा या दोन सौंदर्यवती नायिकांसह ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’मध्ये सहभागी झाल्यमुळे येत्या वीकेण्डच्या भागाची रंजकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
या भागाचा प्रारंभ दणक्यात झाला. सर्वच सपर्धकांनी अप्रतिम आवाजात आपली गाणी सादर केली आणि प्रेक्षकच नव्हे, तर परीक्षक आणि सेलिब्रिटींनाही मंत्रमुग्ध करून सोडले. या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक आदित्य नारायणने सांगितले की कत्रिना कैफला आपल्यासोबत बाहेर जेवायला घेऊन जाण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्या या वक्तव्याने कत्रिनाही खुश झालेली दिसली; पण त्याचा हा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी तिने त्याच्यापुढे एक अट घातली. तिने सांगितले की बाहेर जेवायला येण्यापूर्वी आदित्यने आपल्याला बेली डान्स करून दाखविला पाहिजे आणि त्या नृत्याला साजेसे कपडेही त्यने घातले पाहिजेत. तिची ही विनंती आदित्यने तात्काळ मान्य केली आणि आपल्या कमरेभोवती एक स्कार्फ गुंडाळला आणि त्यावर एक पट्टा लावला. त्यानंतर त्याने अप्रतिम बेली नृत्य करून सर्वांना चकित करून सोडले!
या कार्यक्रमात या तिन्ही कलाकारांनी स्पर्धकांवर स्तुतिसुमने उधळली, त्यांच्याबरोबर नाच केला आणि त्यांना ‘झीरो’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग आणि किस्से ऐकविले. यावेळी परीक्षक शेखर रावजियानीबरोबर स्पर्धक रिचा शर्माने ‘जग सूना लागे’  हे गाणे गाऊन शाहरूखवर असलेली आपली प्रीत व्यक्त केली. ईशिताने गायलेल्या ‘तुझमें रब दिखता है’  या गाण्याने शाहरूख खूपच प्रभावित झाला. त्याने तिला सांगितले की परमेश्वर जेव्हा एखाद्याला सुरेल आवाजाची देणगी देतो, तेव्हा तो त्यात आपला स्वत:चा थोडा अंश घालत असतो. तुझ्या या गाण्यातून मला रबचे दर्शन घडले, असे शाहरूखने तिला सांगितले. ‘सा रे ग म प’च्या आगामी भागात प्रेक्षकांना या स्पर्धकांची अद्वितीय कामगिरी ऐकायला मिळेलच, पण ‘झीरो’  चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांनी केलेली धमालमस्तीही पाहण्याची संधी मिळेल.
अधिक जाणून घेण्यासाठी पाहा ‘सा रे ग म प’ शनिवार-रविवारी रात्री 9.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!









No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...