'कोण होणार करोडपती', ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भूत खेळ! - नावनोंदणी सुरू होते आहे २३ फेब्रुवारीपासून!
ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी पर्व सोनी मराठी वाहिनीवर लवकरच येतंय.
सोनी मराठी वाहिनीवरला 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. गेल्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे.
आता ज्ञानाच्या जोरावर यशाची शिखरं गाठायला तयार राहा, कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येते आहे, 'कोण होणार करोडपती'!
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST