इंडियन आयडल मराठी' ह्या कार्यक्रमामध्ये भारतरत्न लता दिदींसाठी स्वरांजली - १४ फेब्रुवारी, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर
सोनी मराठी वाहिनी आणि फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. यांनी महाराष्ट्रातील गायकांसाठी सुरांचा हा मंच उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमात येत्या १४ फेब्रुवारीला लता दिदींना स्वरांजली वाहण्यात येणार आहे.
संगीतसृष्टीला पडलेलं सुरेल स्वप्न म्हणजे लता मंगेशकर. दिदींनी आपल्या वडिलांकडून गाण्याचं प्रशिक्षण घेऊन अगदी कमी वयात गाण्याची सुरुवात केली. गेली अनेक दशकं लता मंगेशकर या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नायिकांच्या तब्बल चार पिढ्यांना लता दिदींनी आवाज दिला आहे. त्यांचा इहलोकीचा प्रवास जरी संपला असला, तरी त्या त्यांच्या गाण्याच्या रूपाने येणारी अनेक दशकं जिवंत असणार आहेत.
'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर स्पर्धक आणि परीक्षक अजय-अतुल यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहिली. या वेळी गीतकार-कवी गुरू ठाकूर आणि सौमित्र हेसुद्धा उपस्थित होते. हा खास भाग प्रेक्षकांना १४ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. हा २ तासांचा विशेष भाग असणार आहे.
पाहा, इंडियन आयडल मराठी, १४ फेब्रुवारी, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST