Monday, February 21, 2022

मिहीर आणि राजेश्वरी यांची अनोखी प्रेम कहाणी बॉस माझी लाडाची फक्त सोनी मराठी वर - २८ फेब्रुवारीपासून, दररोज रात्री ८:३० वा.

 सोनी मराठीवर नवी मालिका, 'बॉस माझी लाडाची' - २८ फेब्रुवारीपासूनदररोज रात्री :३० वा.

   सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'बॉस माझी लाडाची' ही मालिका २८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दररोज रात्री ८:३० वा. ही मालिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी, माधवी जुवेकर हे नावाजलेले कलाकारही या मालिकेत आहेत. मनवा नाईक हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे. 

          या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये बऱ्याच काळाने छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. भाग्यश्रीने याआधीही आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या वेळी मात्र ती एका स्ट्रिक्ट बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आयुष संजीव हा  मालिकेत मुख्य भूमिका पहिल्यांदाच साकारतो आहे.  

या मालिकेद्वारे ऑफिसमधली धमाल  प्रेमकहाणी प्रेक्षकांना   बघायला मिळणार आहे. घरची बॉस तर बायको असतेच पण जेव्हा ऑफिसची बॉसही बायको असते, तेव्हा मात्र काही खरं नाही. अशीच गत झाली आहे मिहिरची कारण त्याची बायकोच आहे त्याची बॉस. बॉस राजेश्वरी आणि कर्मचारी मिहिर यांची ही गोष्ट आहे. यांचं गोड असं एक कुटुंब आहे ज्यात आजी, आजोबा, काका, काकू, भावंडं आणि एवढंच नाही तर एक मांजरसुद्धा आहे. आता हे गोड कुटुंब, बॉस-बायको राजेश्वरी आणि मिहिर या सगळ्यांना प्रेक्षक २८ फेब्रुवारीपासून भेटू शकणार आहेत. 

 

मालिकेच्या प्रोमोवर उत्तम प्रतिक्रिया आल्या असून सगळ्यांनाच ही नवी मालिका बघण्याची उत्सुकता आहे. २८ फेब्रुवारीपासून, दररोज रात्री ८:३० वा.  सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...