Wednesday, February 9, 2022

अभिनेता विराट मडके 'सोयरीक' मध्ये सूत्रधाराच्या भूमिकेत

 अभिनेता विराट मडके 'सोयरीक' मध्ये सूत्रधाराच्या भूमिकेत

'केसरी'नंतर अभिनेता विराट मडके 'सोयरीक' मधून भेटीला येणार आहे. 'सोयरीक' सिनेमात विराट वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात विराट पोलीस कॉन्स्टेबलच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सिनेमातील अनुभवाबद्दल विराट सांगतो,  ''माझ्यासाठी या  सिनेमाचा अनुभव खास होता, दिग्दर्शक मकरंद माने यांच्या सिनेमाचा मी फॅन आहे. त्यांचे वास्तववादी सिनेमा मनाला भावतात. तसाच सोयरीक हा सिनेमा महत्वाच्या विषयावर थेट भाष्य करणारा आहे, आणि म्हणूनच माझ्याकडे हा सिनेमा आला आणि मी लगेच होकार दिला. ''

'' या सिनेमात माझी शिकाऊ पोलिसाची भूमिका आहे,  तो सिनेमाचा सूत्रधारही आहे.मला माझ्या comfort च्या बाहेर काम करायला आवडत. आणि सोयरीक मधून वास्तववादी भूमिका कायला मिळाली याचा आनंद आहे  .  
'' या सिनेमात माझी शिकाऊ पोलिसाची भूमिका आहे,  तो सिनेमाचा सूत्रधारही आहे.मला माझ्या comfort च्या बाहेर काम करायला आवडत. आणि सोयरीक मधून वास्तववादी भूमिका कायला मिळाली याचा आनंद आहे  .  

मकरंद मानेन सोबत काम करताना खूप शिकायला मिळालं.  त्याचबरोबर किशोर कदम,छाया कदम ,शशांक शेंडे अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही खूप काही देऊन गेला.''असंही  विराट सांगतो.
मकरंद माने दिग्दर्शित सोयरिक सिनेमा ११ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.या शिवाय लवकरच विराटचा एक सिनेमा आणि वेब सिरीज भेटीला येणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...