अजय गोगावलेच्या स्वरानी सजल "सुटले धागे"
मराठी चित्रपटाचं गीत संगीत हे नेहमीच प्रेक्षकांना भावलं असून आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात गीतांना असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. 'अजय गोगावले' या संगीत आणि गायकांचे नाव या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं गेले असून आता पुन्हा एकदा अजय 'सुटले धागे' हे नवीन गाणं आपल्या स्वरात घेऊन येत आहे.
'जिंदगानी' या आगामी सामाजिक विषयावर केंद्रित असलेल्या चित्रपटाचं 'सुटले धागे' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. सुटले धागे या गाण्यातून जिंदगानी चित्रपटातील 'सदा' या मुख्य पात्राच दुःख रेखाटलं आहे. हे गाणं प्रशांत मडपूवार याने लिहिलं असून विजय गवांडे यांनी संगीतबद्ध केले आहे. सुटले धागे हे गाणं जरी या चित्रपटातील सदाचे दुःख चित्रित करत प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. मानवी भाव विश्वाचे चित्रण या गाण्याचे बोल मांडतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन विनायक साळवे यांनी केलं असून सदाच्या भूमिकेत ते चित्रपटात दिसणार आहेत. त्याक्सह बरोबर शशांक शेंडे सुद्धा या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत असून त्यांच्या सोबत वैष्णवी शिंदे ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटात दिसणार असून सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, प्रदीप नवले,संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती यांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती या सुनीता शिंदे यांच्या नर्मदा सिनेव्हीजन्सची ही निर्मिती आहे. या चित्रपटाचं संकलन निलेश गावंड, संगीत विजय गवंडे यांनी केले असून चित्रपटातील गाणी प्रशांत मडपूवार याने लिहिली आहेत तर आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे आणि अमिता घुगरी यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी सजली आहेत
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST