Friday, February 18, 2022

लकडाऊनच्या निमित्ताने शुभा खोटे पुन्हा सुवर्ण पडद्यावर

 लकडाउनच्या सेटवर मेजवानी आणि बरच काही

 

भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास हा एका शतकाहून मोठा आहे. १९१३ला पहिल्या चित्रपटानंतर भारतीय मनोरंजन सृष्टीचा सुवर्ण काळ सुरु झाला तो म्हणजे ५० ते ८० च्या दशकातया दशकांत वावरणारे अनेक कलाकार आज 'लेजेंडम्हणून सिनेसृष्टीत वावरतात आणि अशाच एक लेजेंड म्हणजे 'शुभा खोटे'. १९५३ पासून ते आता पर्यंत त्या मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत.



               सीमा या पहिल्या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत त्या सिनेसृष्टीत रुजू झाल्या, 'मेहमूदया अष्टपैलू कलाकाराच्या यांच्या सोबत त्यांची जोडी चांगलीच जमली होती. आपल्या या ६९ वर्षाच्या कारकिर्दीत शुभा खोटे यांनी तब्बल ५६ सिनेमामध्ये काम केलं असून आता यात अजून एका चित्रपटाची भर पडली आहे ती म्हणजे 'लकडाऊन बी पॉझिटिव्हया चित्रपटाचीयेत्या २५ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात शुभा खोटे यांची महत्वाची भूमिका असून तब्बल ४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आणि लॉकडाऊनमुले एकाच घरात अडकलेल्या कुटुंबाची आणि नवविवाहित जोडप्याची गोष्ट 'लकडाऊन बी पॉझिटिव्हहा चित्रपट सांगतो. सर्वांची लाडकी आजी म्हणून शुभा खोटे या चित्रपटात आपल्याला दिसणार असूनत्यांच्यासारखी आजी सर्वांना मिळो असं प्रेक्षक बोलतील अशी त्यांची भूमिका आहे. या कुटुंबाच्या प्रमुख म्हणून शुभा खोटे असून आपल्या नातवाच्या लग्नातली धांदल त्या अनुभवत आहेत. तब्बल ८४ वर्षाच्या शुभा खोटे या चित्रपटाच्या दरम्यान स्वतःहून आघाडी घेत सेट वर सगळ्यांच्या आधी हजर राहत तर सेटवर अनेकदा त्यांनी आपल्या हाताने सगळ्यांसाठी जेवण सुद्धा त्यांनी बनवलं होत. विनोदी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती इष्णव मीडियाची आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मिता स्मिता खरात असून चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे. शरद सोनवणेदर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...