ठाणे-नवी मुंबई आणि रायगड मधील हृदयग्रस्त रुग्णांना मिळाली नवीन आशा
नवी मुंबईत पहिल्यांदाच पार पाडली 'माइट्राक्लिप' प्रक्रिया
नवी मुंबई, ८ ऑगस्ट 2023 - नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स (एएचएनएम) ने ठाणे - नवी मुंबई आणि रायगड विभागांमध्ये पहिल्यांदाच ‘माइट्राक्लिप’ प्रक्रियेचा वापर केला आहे. टोरेंशियल मायट्रल रिगर्जिटेशन (एमआर) ने ग्रस्त असलेल्या तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी उच्च जोखीम असलेल्या रुग्णावर ही महत्वाची प्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली, ज्यामुळे रुग्णाची लक्षणे कमी झाली. माइट्राक्लिप प्रक्रिया इंटरव्हेंशनल कार्डिओलोजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजीवकुमार कळकेकर यांच्या नेतृत्वात पार पडली आणि सीव्हीटीएस सल्लागार डॉ. शंतेश कौशिक, कार्डिओलॉजीचे कनिष्ठ सल्लागार डॉ. प्रशांत कश्यप, ऍनेस्थेशिओलॉजीचे सल्लागार डॉ. सौरभ तिवारी आणि चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. साई सतीश अशा तज्ञ टीमची साथ लाभली.
मायट्रल व्हॉल्व्ह रिगर्जिटेशन ही हृदयाची एक संभाव्य गंभीर स्थिती आहे, जी हृदयाच्या व्हॉल्व्हला घट्ट बंद होण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे रक्त मागच्या बाजूला वाहू लागते. या स्थितीमुळे अनेकदा श्वास घेण्यास अडचण, धडधडणे आणि पेडल एडेमा होतो. सर्जिकल मायट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही पारंपारिक उपचार पद्धती आहे, ज्यामुळे शस्त्रक्रियेतील गुंतागुंत, ऍनेस्थेसिया (भूल) संबंधित जोखीम, लो इजेक्शन फ्रॅक्शन आणि इतर संभाव्य सहव्याधी स्थितींसारख्या जोखमी संभवतात. माइट्राक्लिप प्रक्रिया हा एक शस्त्रक्रियाविरहित पर्याय आहे, आता ही प्रक्रिया नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सद्वारे सादर करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे प्रदेशामध्ये हृदय संबंधित वैद्यकीय सेवेत महत्वाचे पाऊल पडले आहे.
संजीवकुमार कळकेकर, वरिष्ठ सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले की,"आमच्या रुग्णाला गंभीर दुय्यम एमआर आणि लो इजेक्शन फ्रॅक्शन यासह डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचा त्रास होता. पारंपारिक ओपन हार्ट शस्त्रक्रियेतील उच्च जोखीम पाहता रुग्णाचे समुदेशन करण्यात आले आणि त्याच्या स्थितीवर उपाय म्हणून माइट्राक्लिप प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला गेला. परिणाम आश्चर्यकारकरित्या सकारात्मक होता, त्यामुळे या प्रदेशातील असंख्य रुग्णांसाठी या प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी दरवाजे उघडले गेले आहेत. मायट्रल व्हॉल्व्हच्या दोन्ही लीफ्लेट्स पकडण्यासाठी (ग्रॅस्प करण्यासाठी) आणि क्लिप जोडण्यासाठी किमान वेदनादायक मार्ग वापरून, माइट्राक्लिप प्रक्रिया फेमोरल शिरेच्या प्रवेशाद्वारे संपन्न झाली. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, रुग्णाला ताबडतोब बाहेर काढण्यात आले आणि नंतर डिस्चार्ज देण्यात आला. तिच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली आहे आणि तिला तिची दैनंदिन सामान्य कामे करताना कोणतीही अडचण येत नाही."
श्री.संतोष मराठे, सीईओ -पश्चिमी प्रादेशिक भाग, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले की,"माइट्राक्लिप प्रक्रियेचे यश म्हणजे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्ससाठी एक महत्वाचा टप्पा आहे. हे यश खरे तर रुग्णांच्या फायद्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देण्याच्या आमच्या अतूट बांधिलकीचे प्रतिनिधित्व करते. यातून इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीमधील आमचे यश दिसून येते आणि ज्या रुग्णांना पारंपारिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया करता येत नाही त्यांना नवी आशा प्रदान केली जाते."
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST