Thursday, August 24, 2023

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या फिटनेस प्रोग्रामकरिता मार्गदर्शकाच्या भूमिकेत

 क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या फिटनेस प्रोग्रामकरिता मार्गदर्शकाच्या भूमिकेत

 


सलाम बॉम्बे फाउंडेशन (एसबीएफ)’च्या क्रीडा अकादमीच्या वतीने भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्यासह मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. पालिका शाळा किंवा सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या कुमारवयीन विद्यार्थ्यांपैकी ‘फिटनेस मॉनिटर’ना आपल्या फिटनेसची कहाणी या क्रिकेटपटूने सांगितली. हे शाळकरी विद्यार्थी अकादमीच्या फिटनेस प्रोग्राम अंतर्गत प्रशिक्षण घेत असून त्यांची निवड तंदुरुस्तीविषयी दीर्घकालीन स्वारस्यासाठी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कुमारवयीन मुलांना त्यांच्या समाजासाठी परिवर्तनाचे शिलेदार होत असताना सुदृढ जीवनशैलीचा अंगीकार करण्याची प्रेरणा देण्याचे आहे. या उपक्रमाच्या सत्राचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना अजिंक्य रहाणे समवेत संवाद साधण्याची संधी मिळाली, भारताचा अग्रगण्य क्रिकेटपटू होण्याच्या त्याच्या तंदुरुस्ती प्रवासाविषयी जाणून घेता आले. सलाम बॉम्बे फाउंडेशन’च्या वतीने अजिंक्य रहाणे आणि विद्यार्थ्यांकरिता क्रिकेट, फिटनेस आणि मोटर स्किल डेव्हलपमेंटचा एकत्रित संगम असलेल्या धमाल तंदुरुस्ती क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले होते.   

 

वंचित कुमारवयीनांचा सहभाग विविध क्रीडा प्रकारांत वाढत असताना सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने 100 तासांच्या 2 वर्षीय फिटनेस प्रोग्राम विद्यार्थ्यांचा फिटनेसचा स्तर राखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम किशोरांना क्रीडा उद्योगासाठी लागणारी फिटनेस आणि इतर क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ देखील उपलब्ध करून देतो. सलाम बॉम्बे फाउंडेशन’च्या वतीने “फिटीझन्स इनिशिएटिव्ह” सोबत एक पाऊल पुढे टाकण्यात येते आहे. जिथे क्रीडा आणि फिटनेस या विषयांत करिअर करण्याची क्षमता असलेल्या त्यांच्या समुदायावर प्रभाव पाडण्यासाठी प्रेरणा दर्शविणाऱ्या उत्साही विद्यार्थ्यांची निवड ‘फिटनेस मॉनिटर’ म्हणून करण्यात आली. हे फिटनेस मॉनिटर कालांतराने त्यांच्या समुदायात सत्रे आयोजित करून फिटनेसचे महत्त्व पटवून देऊ शकतात. तसेच संपूर्ण सत्रांमध्ये प्रत्येक समुदाय सदस्याच्या तंदुरुस्ती स्तरांचा डिजिटलपणे मागोवा घेतात. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या  विद्यार्थ्यांना फिटनेस स्तरांच्या डिजिटल ट्रॅकिंगसाठी टॅब्लेट उपलब्ध करून देते. ज्याठिकाणी फिटनेस मॉनिटर समुदाय सदस्यांच्या तंदुरुस्ती स्तरांचे पुनरावलोकन करून त्यांना मार्गदर्शन करतात. या कार्यक्रमातंर्गत कुमारवयीन विद्यार्थ्यांना क्रीडा उद्योगाशी संबंधित तांत्रिक कौशल्यांसह अद्ययावत करण्यात येते आहे.


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2019 दरम्यान सुरू केलेल्या भारत सरकारच्या 'फिट इंडिया मूव्हमेंट'मध्ये योगदान देण्याच्या आशेने, सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या  वतीने 'फिटीझन्स इनिशिएटिव्हचा विस्तार झोपडपट्टीपासून ते गणपती मंडप, सामुदायिक उद्याने, बृहनमुंबई महानगरपालिका बस डेपो, वृद्धाश्रम आणि कॉर्पोरेट कार्यालयांपर्यंत करण्यात आला. सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि किशोरवयीन फिटनेस मॉनिटर लक्ष्य गट (टार्गेट ग्रुप) ओळखण्यासाठी आणि लक्ष्य गटाच्या वय आणि तंदुरुस्ती स्तरांवर आधारित सत्रे सानुकूलित करण्यासाठी एकत्र काम करतात. नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक समुदायातील सदस्याला 5 तंदुरुस्ती सत्र चक्रातून नेण्यात येते, ज्यात ‘स्ट्रेंथन युअर डेली मूव्हमेंट,फिटनेस एनीव्हेअर अँड एनीटाइम’ आणि ‘चेंज युअर माइंडसेट टू चेंज युवर लाइफस्टाइल’ यांचा समावेश आहे.

 

श्री. अजिंक्य रहाणे यावेळी व्यक्त होताना म्हणाला, “सलाम बॉम्बे फाउंडेशनचा “फिटनेस प्रोग्राम” तसेच “फिटिझन्स इनिशिएटिव्ह” हा वंचित घटकांतील किशोरवयीन आणि त्यांच्या समुदायांत तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या किशोरवयीन मुलांना चांगल्या आरोग्याचे दूत म्हणून नियुक्त करण्याच्या या अनोख्या स्वरूपाचा त्यांच्या जीवनावर निश्चितच प्रेरणादायक प्रभाव पडेल. महानगरपालिका किंवा सरकारी शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलास सलाम बॉम्बे फाउंडेशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या फिटनेस प्रोग्राममध्ये प्रवेश आवश्यक आहे असं मला वाटते. तसेच त्यांना त्यांच्या समुदायांत मन आणि शरीर दोन्हीसाठी चांगल्या आरोग्याची भावना पसरवण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. माझी फिटनेसची तत्त्वे या तेजस्वी विद्यार्थ्यांना सांगून प्रेरणा दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे. त्यांनी त्यांच्या समुदायासाठी चांगल्या आरोग्याची मशाल तेवत ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनमध्ये आणखी नवयुवा मनांना मार्गदर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहे.


सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या संस्थापिका पद्मिनी सेखसरिया म्हणाल्या,“आजच्या काळातील तरुणांचा आदर्श असलेला अजिंक्य रहाणेसारखा क्रिकेटपटू आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून लाभला आणि त्याने आमच्या विद्यार्थ्यांना आयुष्याचे शिखर गाठण्यासाठी प्रेरित केले ही आमच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत आयुष्य व्यतीत करणाऱ्या वंचित घटकांतील कुमारांसाठी काम करतो. या नवतरुणांना फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा क्रीडाविषयक कोणतीच पार्श्वभूमी नाही. या मुलांचे शरीर आणि मन आरोग्यदायी ठेवायचे असल्यास मैदान प्रभावी साधन ठरते, यावर आमचा विश्वास आहे. खेळ आणि तंदुरुस्तीच्या माध्यमातून या किशोरांच्या वृत्तीत बदल करण्याचे, शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हा महान क्रिकेटपटू सहभागी झाल्याने समाजाच्या वंचित घटकाला बळ मिळणार आहे, कारण या वर्गाचे अपुऱ्या साधन - सुविधांमुळे आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. आमच्या विद्यार्थ्यांकरिता अजिंक्य या स्वरूपाच्या आणखी प्रेरक सत्रांचे आयोजन करेल ही आशा व्यक्त करते. आगामी पिढ्यांसाठी फिट इंडिया’ची निर्मिती करण्याच्या दिशेने तो करत असलेले प्रयत्न आणि त्याच्या वचनबद्धतेचे आम्हाला कौतुक वाटते.”

 

आजवर, सलाम बॉम्बे स्पोर्ट्स अकॅडमीच्या “फिटनेस प्रोग्राम” माध्यमातून सुमारे 2,200 विद्यार्थी (1,050 किंवा जवळपास 48% मुली) प्रशिक्षित झाले आहेत, ज्यापैकी 100 जणांची निवड ‘फिटनेस मॉनिटर्स’ म्हणून करण्यात आली. मागील वर्षभरात भारतातील 4,400 पेक्षा अधिक समुदाय सदस्यांना “फिटीझन प्रोग्राम” अंतर्गत आमच्या किशोरवयीन ‘फिटनेस मॉनिटर्स’नी प्रशिक्षित केले आहे.    

 

सलाम बॉम्बे फाउंडेशनविषयी

 

शाळेतील / शाळेत शिकणाऱ्या मुलाला भविष्य असते

 

सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या माध्यमातून साल 2002 मध्ये मुंबईच्या झोपडपट्टयांमधील 12 ते 17 वयोगटातील कुमारवयीनांकरिता कामाची सुरुवात झाली. ही मुलं अतिशय गरीब अवस्थेत “अत्यंत जोखमी’त आयुष्य कंठत होती. ही मुलं ज्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जातात, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष, करिअर मार्गदर्शन किंवा मनाला चालना देणारे उपक्रम राबविण्यासाठी साधने नाहीत. अनेक मुलं कुपोषित आहेत. तसेच त्यांना मादक पदार्थांच्या सेवनाचा धोका आहे. ते आर्थिकदृष्ट्या सशक्त नसलेल्या घरातून आलेले आहेत. त्यांना माध्यमिक शाळेतील शिक्षण सोडून स्वत:च्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरी मिळविण्यासाठी दबाव आणला जातो. ही वास्तविकता लक्षात घेता, सलाम बॉम्बे फाउंडेशनने बाल-अनुकूल, नाविन्यपूर्ण शिक्षण साधनांच्या क्षमतेचा वापर करून जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि या किशोरवयीन मुलांचा सशक्त व्यक्तिमत्वात विकास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित केली आहेत, त्यांच्यासमोरील आव्हानांना तोंड देण्यास आणि त्यांच्या समुदायात नेतृत्व स्वीकारण्यास सक्षम केले आहे.

 

हे फाउंडेशन मुलांना त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेबद्दल योग्य निवडी करण्यासाठी सक्षम करून शाळेत ठेवते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासह भरभराट होईल याची दक्षता घेते. शालेय नेतृत्व आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम "जोखीम असलेल्या" किशोरवयीन मुलांना परिवर्तनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जीवन कौशल्यांनी सुसज्ज करतात. क्रीडा, कला आणि मीडिया अकादमी त्यांना स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करून कामगिरीच्या संधी प्रदान करतात. ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो. skills@school कार्यक्रम त्यांच्या करिअरची क्षितिजे विस्तृत करतो शाश्वत करिअरसाठी त्यांना व्यावसायिक कौशल्यांसह सक्षम करतो. ड्रीमलॅब उपक्रमाद्वारे, सलाम बॉम्बे फाउंडेशनने 14 आणि 18 वर्षे वयोगटातील तरुणांना सतत कौशल्य प्रशिक्षण आणि बाजारपेठ-आधारित इंटर्नशिपची तरतूद केली आहे. जुलै 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली, ड्रीमलॅब ही नऊ रोजगार क्षेत्रातील 163 skills@school माजी विद्यार्थ्यांना स्टायपेंड-आधारित इंटर्नशिप प्रदान करण्यात सक्षम आहे. ड्रीमलॅब तळागाळातील उद्योजक महत्त्वाकांक्षा असलेल्या किशोरवयीन मुलांचा टॅलेंट पूल देखील तयार करते. सलाम बॉम्बे उपक्रम आत्मविश्वास वाढवतात, समाजात असुरक्षित वातावरणातील किशोरवयीन मुलांना अर्धवेळ कमावण्याचे आणि शाळेत राहण्याचे त्याचप्रमाणे त्यांच्या अंगीभूत क्षमतेचा संपूर्ण शोध घेण्यासाठी साधने उपलब्ध करून देतात.

 

कृपया अधिक माहितीसाठी संपर्क करा www.salaambombay.org

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...