Wednesday, August 9, 2023

गौतमीच्या डीजे शो वर भारी पडली माधुरीची मराठमोळी लावणी महाराष्ट्र गाजवणा-या दोन नृत्यांगना एकाच मंचावर; गौतमी पाटीववर भारी पडली माधुरी पवार लावणी कशी असते, हे अभिनेत्री माधुरी पवारला माहित आहे, म्हणूनच तर गौतमीच्या डीजे शो वर भारी पडली माधुरीची मराठमोळी लावणी

गौतमीच्या डीजे शो वर भारी पडली माधुरीची मराठमोळी लावणी महाराष्ट्र गाजवणा-या दोन नृत्यांगना एकाच मंचावर; गौतमी पाटीववर भारी पडली माधुरी पवार लावणी कशी असते, हे अभिनेत्री माधुरी पवारला माहित आहे, म्हणूनच तर गौतमीच्या डीजे शो वर भारी पडली माधुरीची मराठमोळी लावणी


महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या दोन व्यक्ती असं जरी म्हटलं तरी लगेच
माधुरी पवार आणि गौतमी पाटील अशी दोन नावं आठवतात.  कारण महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रम गाजवण्यात या दोघी अग्रेसर आहेत. अभिनेत्री माधुरी पवार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी त्यांच्या नृत्यांतून जनतेची मनं जिंकली आहेत. दोघींचाही फॅन क्लब प्रचंड मोठा आहे. आतापर्यंत या दोघींना चाहत्यांनी वेगवेगळ्या मंचावर पाहिले आहे. पण नुकतंच, इतिहासात पहिल्यांदाच या दोघी एकत्र आणि एकाच मंचावर दिसल्या आणि निमित्त होते हडपसर येथील ‘टिओस कॅफे’चे उद्घाटन.

माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींच्याही अदा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. तसेच दोघींचीही नृत्य सादर करण्याची शैली देखील वेगळी आहे. दोघींचीही क्रेझ जास्त असली तरी सुध्दा या कार्यक्रमात गौतमीच्या डीजे शो वर माधुरीची मराठमोळी लावणी भारी पडली.

झी युवा वरील 'अप्सरा आली' या डान्स रिॲलिटी शोची विजेती म्हणून माधुरीने तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश कमवले. स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. लावणी हा महाराष्ट्राची लोककला आणि लावणी नेमकी काय असते हे लावण्यवती माधुरी पवार पेक्षा चांगली कोणाला माहित असणार. दिलखेचक अदांनी लावणी सादर करणारी माधुरी ही महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री, नृत्यांगना आहे, हे या कार्यक्रमात माधुरीने सिध्द करुन दाखवलं. माधुरीने सादर केलेल्या लावणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि तिचे कौतुक देखील झाले.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...