Saturday, August 26, 2023

इंडियन आयडलमध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा

 इंडियन आयडलमध्ये सहभागी व्हायचेमग ही बातमी नक्की वाचा


मुंबईमध्ये इंडियन आयडलचे ऑडिशन कधी आणि कुठे आहे हे जाणून घ्या सविस्तर...

 

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडलया शोच्या मंचावर अनेकांना आपल्या सुरेल आवाजाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहेइंडियन आयडल या शोमुळे अनेकांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहेआता इंडियन आयडल मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेतुम्हाला या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर ही बातमी नक्की वाचा...

 

उभरत्या गायकांना त्यांची कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी निर्मात्यांनी मुंबई शहरात ऑडिशन ठेवले आहेहे ऑडिशन २७ ऑगस्ट २०२३ रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूलनाहर्स अमृतशक्तीचांदिवली फार्म रोडऑफ साकीनाका रोडअंधेरी पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहेत्यामुळे इच्छुक स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

 

इंडियन आयडलची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेतज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक गायकही मिळाले आहेतआता ‘इंडियन आयडल  मराठी’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहेसोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना ‘इंडियन आयडल मराठी’ लवकरच पाहायला मिळणार आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...