Wednesday, August 23, 2023

शाडूच्या मूर्तींना मागणी व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस

                शाडूच्या मूर्तींना मागणी व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस  

यंदापासून घरगुती गणेशमूर्ती शाडूची बनवणे बंधनकारक


 ठाणे, २३ ऑगस्ट २०२३:- बाप्पाच्या आगमनाला अजून काही दिवस बाकी आहेत. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी होती. ती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे, अचानक गणेशमूर्तीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तिकारांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


यंदाच्या वर्षी घरगुती मूर्ती शाडूमातीच्या बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याकडे मूर्तिकारांचा कल अधिक दिसत आहे. गिरगाव, लालबाग, परळ, ठाणे, डोंबिवली इत्यादी भागांतील मूर्ती कारखान्यांत गणेशभक्तांची मागणी नोंदवण्यासाठी वर्दळ वाढली आहे. यंदा परदेशात पीओपीच्या मूर्तींना मोठी मागणी आहे पेण शहरातून परदेशात पीओपीच्या पन्नास हजारांपेक्षा जास्त गणेशमूर्ती आतापर्यंत पाठवण्यात आल्या आहेत. तर हमरापूर, तांबडशेत, कळवे, जोहे या कलानगरीतून बारा लाख गणेशमूर्तींचे देशांतर्गत आणि राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांत वितरण झाले आहे मूर्तिकार दिपेश म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.      .      


पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींना अधिक मागणी होती. प्रशासनाने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घातल्याने पुन्हा शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. डोंबिवली, चिन्मय कला निकेतन मधील मूर्तिकार दिपेश म्हात्रे यांनी सांगितले,‘’की आम्ही शाडूच्याच मूर्ती बनवतो; मात्र पीओपीचे प्रमाण वाढू लागल्याने आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. काही वेळा तयार मूर्ती आणून त्यांची विक्री करू लागलो. यंदापासून घरगुती गणेशमूर्ती शाडूची बनवणे बंधनकारक केल्याने आमच्या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येतील, अशी आशा दिपेश म्हात्रे यांना आहे’’.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...