Friday, August 11, 2023

महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा फॅमिली शो - 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

 महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा फॅमिली शो - 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

- सोनी मराठी वाहिनीवर १४ ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवार रात्री  वा. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या!

                           मुंबई , १० ऑगस्ट २०२३ : प्रत्येक मराठी रसिकाच्या आयुष्यात हास्याचे क्षण पेरण्याचे काम ज्या कार्यक्रमाने केले तो कार्यक्रम म्हणजे सोनीमराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! 'महाराष्ट्राच्या टेंशनवरची मात्रा म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', असे म्हणत या विनोदी कार्यक्रमाने समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलेविशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनी आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्राया दोघांची सुरुवात एकाच दिवशी झाली आहेसोनी मराठीवरील या तुफान लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपला मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहेकोविड काळात तर 'महाराष्ट्राची हास्यजत्राही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या टेंशन वरची मात्रा ठरलीत्या वेळी सगळीकडे निराशेचे काळे ढग दाटले असताना 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा रसिकांच्या मनात आनंदाची किनार घेऊन येत होतामहाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा अन् कुटुंबासोबत बसून पाहण्याचा फॅमिली शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर  ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत तुमचं सहकुटुंब स्वागत करायला तयार आहेत
                                         'महाराष्ट्राची हास्यजत्राया विनोदी कार्यक्रमाला तब्बल पाच वर्षं पूर्ण झाली आहेतआता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला हास्यजत्रेच्या विनोदावीरांचा चमू सज्ज झाला आहेअन् तोदेखील कॉमेडीचा फॅमिली पॅक घेऊनदिवसभरातील संपूर्ण टेंशन विसरून रात्री प्रत्येक कुटुंबाला एकत्र बसून आनंदाचे क्षण मिळवून देण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रापुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येते आहेमग आता कुटुंबासोबत खळखळून हसायला तयार व्हाकारण पुन्हा येतेय तुमची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या१४ ऑगस्टपासूनसोम.-गुरु., रात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.

                                        कॉमेडीचा बाजअचूक टायमिंग आणि वन टेकमध्ये विनोदवीरांनी साकारलेल्या हास्याच्या या जादूला प्रेक्षकांनी यापूर्वीच डोक्यावर घेतले आहे.यातील फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखालॉली असो किंवा शंकऱ्या-शितलीची लव्ह स्टोरीयातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेतअभिनेता गौरव मोरेप्रसाद खांडेकरसमीर चौगुले , दत्तू मोरेअभिनेत्री वनिता खरातनम्रता संभेराव आदी कलाकारांना या हास्यजत्रेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहेयाचे सगळे श्रेय जाते ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखकदिग्दर्शकनिर्माते असलेल्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनात्यांच्या बहारदार लेखणीतून उतरलेले विनोद आणि मार्मिक भाष्य यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहेदर दिवशी नव्या जोमाने केलेले भन्नाट विनोदी स्कीटसद्यस्थितीवर केलेले तिरकस भाष्य आणि परीक्षकांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांवर केलेले विनोद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरलेयाशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे खुमासदार सूत्रसंचालनअभिनेतादिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचे परीक्षण या सर्व गोष्टी प्रेक्षकांना भावणाऱ्या आहेत.

या अतरंगी कलाकारांबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला एकत्र जोडण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू याहा फॅमिली शो १४ ऑगस्टपासून  सोमवार ते गुरुवार रात्री  वासोनी मराठी वाहिनीवर पाहायला विसरू नका.v

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...