Friday, August 18, 2023

रेनॉकडून महाराष्‍ट्रात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' लाँच

 रेनॉकडून महाराष्‍ट्रात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' लाँच

रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज ग्राहकांना एक थांबा सोल्‍यूशन प्रदान करण्‍यासाठी सर्व ठिकाणी ऑन स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग व फायनान्‍स पर्याय देखील प्रदान करेल 

रेनॉ इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (आरआयपीएल) या भारतातील पहिल्‍या क्रमांकाच्‍या युरोपियन कार ब्रॅण्‍डला महाराष्‍ट्रात त्‍यांची उल्‍लेखनीय मोहिम 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज'च्‍या लाँचची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटतो. हा नाविन्‍यपूर्ण व सर्वोत्तम उपक्रम भारतीयांच्‍या ब्रॅण्‍डशी संलग्‍न होत अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतीला पुनर्परिभाषित करण्‍याची खात्री देतो. 


या अनपेक्षित उपक्रमाचा भाग म्‍हणून रेनॉने भारतातील २६ राज्‍ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमधील ६२५ ठिकाणी 'शोरूम ऑन व्हील्‍स' सादर केले आहे. या मोहिमेचा भाग म्‍हणून हा उपक्रम महाराष्‍ट्रातील ३१ ठिकाणी राबवण्‍यात येईल. या मोहिमेसह रेनॉसाठी उल्‍लेखनीय परिवर्तनाची सुरूवात झाली आहे, ज्‍यामधून राज्‍यातील नाविन्‍यता व ग्राहक-केंद्रित्वाप्रती कंपनीची समर्पितता दिसून येते. 

'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिमेमधून रेनॉची नाविन्‍यता आणि ग्राहक-केंद्रितपणाप्रती कटिबद्धता दिसून येते. 'शोरूम ऑन व्‍हील्‍स'च्‍या माध्‍यमातून ग्राहकांना घरपोच शोरूम अनुभव देत आणि 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स'सह सोईस्‍कर व कार्यक्षम वेईकल सर्विसिंग देत रेनॉचा महाराष्‍ट्रातील ग्राहकांना अद्वितीय व आनंददायी अनुभव देण्‍याचा उद्देश आहे. यासह रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज ऑन स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग व कार फायनान्‍स पर्याय देखील देईल, ज्‍यामुळे ते ग्राहकांसाठी एक थांबा सोल्‍यूशन असेल. 


रेनॉ इंडियाच्‍या कार्यसंचालनांचे कंट्री सीईओ व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. वेंकटराम ममिल्लापल्ले या उपक्रमाबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ''आम्‍हाला उत्‍साही महाराष्‍ट्र राज्‍यात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिम लॉन्‍च करण्‍याचा आनंद होत आहे. हा उपक्रम आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांच्‍या ब्रॅण्‍डशी संलग्‍न होण्‍याच्‍या पद्धतीला पुनर्परिभाषित करण्‍याच्‍या दिशेने मोठी झेप आहे. नाविन्‍यता व ग्राहक-केंद्रित्वाप्रती आमच्‍या कटिबद्धतेमुळे आम्‍ही 'शोरूम ऑन व्‍हील्‍स' आणि 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना घरपोच शोरूम व वर्कशॉप अनुभव दिला आहे.

रेनॉमध्‍ये आम्‍हाला ग्राहकांसाठी सोयीसुविधा व उपलब्‍धतेचे महत्त्व माहित आहे. 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिमेसह आमचा महाराष्‍ट्रातील सर्व ३१ ठिकाणी ऑन-द-स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग सुविधा व कार फायनान्‍स पर्याय देत अद्वितीय व आनंददायी अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे. हा सर्वसमावशेक दृष्टीकोन या मोहिमेला ग्राहकांच्‍या ऑटोमोटिव्‍ह गरजांसाठी एक-थांबा सोल्‍यूशन बनवतो. हा नाविन्‍यपूर्ण दृष्टीकोन उच्‍च दर्जाच्‍या ग्राहक सेवेप्रती आमच्‍या कटिबद्धतेवर भर देण्‍यासह राज्‍यामधील आमचे सेवा नेटवर्क दृढ देखील करतो.'' 

मायदेश फ्रान्‍समध्‍ये विक्री आकारमानाच्‍या संदर्भात अव्‍वलस्‍थानी असलेल्‍या आणि युरोपमध्‍ये दुसरे स्थान मिळवलेल्‍या रेनॉच्‍या मायदेशातील सर्वोत्तम कामगिरीमधून ब्रॅण्‍डची सर्वोत्तमता व सातत्‍यपूर्ण नाविन्‍यतेप्रती कटिबद्धता दिसून येते. लाँच करण्‍यात आलेली मोहिम 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' रेनॉ इंडियाच्‍या विकास धोरणामधील पुढील टप्‍प्‍याला सादर करते, जेथे कंपनी भारतीय बाजारपेठेत मोठा प्रभाव निर्माण करण्‍यासाठी आपल्‍या यशस्‍वी जागतिक धोरणांचा फायदा घेते.  

'शोरूम ऑन व्‍हील्‍स' रेनॉच्‍या शोरूम्‍सचे मोबाइल विस्‍तारीकरण म्‍हणून सेवा देईल, ज्‍यामधून संभाव्‍य ग्राहकांना आधुनिक रेनॉ वेईकल्‍स जवळून पाहण्‍याची व अनुभव घेण्‍याची संधी मिळेल. तज्ञ विक्री कर्मचारी सविस्‍तर माहिती सांगण्‍यासाठी आणि ग्राहकांना योग्‍य निवड करण्‍यामध्‍ये साह्य करण्यासाठी उपस्थित असतील. 

दुसरीकडे, 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' उपक्रम ग्राहकांना घरपोच रेनॉ वेईकल्‍सचे विनासायास देखरेख व सर्विसिंगची खात्री देईल. अत्‍याधुनिक साधनांसह सुसज्‍ज आणि उच्‍च कुशल टेक्निशियन्‍सद्वारे कार्यान्वित हे वर्कशॉप्‍स देशभरातील रेनॉ मालकांना अद्वितीय सोयीसुविधा व कार्यक्षमता देतील. 

शोरूम ऑन व्‍हील्‍समध्‍ये रेनॉचे मॉडेल्‍स जसे वैविध्‍यपूर्ण ट्रायबर, स्‍पोर्टी कायगर आणि स्‍टायलिश क्विड यांच्‍या इंटरअॅक्टिव्‍ह प्रदर्शनाचा समावेश असेल, ज्‍यामुळे अभ्‍यागतांना रेनॉचे आधुनिक इनोव्‍हेशन्‍स, सुरक्षितता वैशिष्‍ट्ये व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळण्‍यासोबत त्‍यांच्‍या सोईनुसार त्‍यांच्‍या आवडत्‍या मॉडेल्‍सची टेस्‍ट ड्राइव्‍ह करता येईल. रेनॉ ट्रायबर भारतातील सर्वात सुरक्षित मास सेगमेंट ७-आसनी वेईकल आहे आणि या वेईकलमध्‍ये उल्‍लेखनीय दर्जा, मॉड्युलॅरिटी व आकर्षक डिझाइनसह उच्‍च दर्जाचे व्‍हॅल्‍यू पॅकेजिंग आहे. तसेच रेनॉ ट्रायबरच्‍या सर्व वैशिष्‍ट्यांमध्‍ये विभागातील ६२५ लीटरचे सर्वात मोठे बूट स्‍पेस (सामानाची जागा) आहे. ही वेईकल उत्तम दर्जाच्‍या सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह निर्माण करण्‍यात आली आहे आणि या वेईकलला ग्‍लोबल एनसीएपीने प्रौढ प्रवाशांच्‍या सुरक्षिततेसाठी ४-स्‍टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. 

रेनॉ इंडियाने 'प्रोजेक्‍ट विस्‍तार'अंतर्गत भारतातील फिजिकल नेटवर्क पायाभूत सुविधा ४५० हून अधिक विक्री व ५०० हून अधिक सर्विस टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढवल्‍या आहेत, ज्‍यामध्‍ये देशभरातील २३० हून अधिक वर्कशॉप ऑन व्‍हील्‍सचा समावेश आहे. 

रेनॉ इंडिया या परिवर्तनात्‍मक प्रवासाचा भाग होण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील सर्वांना आमंत्रित करत आहे, जेथे ब्रॅण्‍डचा राज्‍यातील लोकांना अद्वितीय अनुभव देण्‍याचा प्रयत्‍न आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...