Monday, August 14, 2023

"कारण गुन्ह्याला माफी नाही" मालिकेतून डॉ. गिरीश ओक एका वेगळ्या भूमिकेत सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता

"कारण गुन्ह्याला माफी नाही" मालिकेतून डॉ. गिरीश ओक एका वेगळ्या भूमिकेत सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता

सोनी मराठी वाहिनीवरील कारण गुन्ह्याला माफी नाही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेनेहमीच्या मालिकेपेक्षा निराळा विषय असल्यामुळे आणि मालिकेचा विषय थरारक असल्याने प्रेक्षकांचं या मालिकेवर जास्त प्रेम पाहायला मिळत आहेमालिकेतील पात्रांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळत आहेविशेष म्हणजे भोसलेजमदाडे आणि अनुजा हवालदार या पात्रांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहेनेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही या नव्या मालिकेत आता अभिनेते गिरीश ओक यांची एन्ट्री होणार आहेवसंत रणदिवे असे या व्यक्तिरेखेचं नाव आहेबऱ्याच काळाने मालिकेत पुनरागमन ते करत आहेतमालिका रंजक वळणावर आली असताना त्यांची मालिकेत एन्ट्री होत आहे त्यामुळे मालिका आता काय वळण घेणार हे पाहायला मिळेल.

              ‘तुमची मुलगी काय करते या मालिकेची टीम या मालिकेसाठीच कार्यरत आहेहरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांबरोबरच आता अश्विनी कासार हीसुद्धा पोलीस गणवेशात पाहायला मिळत आहेयांचे हे स्पेशल ओप्रेशन स्कॉड मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेया मालिका जेव्हापासून पसुरु झाली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहेअश्विनी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेआणि आता गिरीश ओक यांच्या येण्याने मालिका अजूनच थरारक आणि रंजक होणार हे नक्की.  पाहायला विसरू नका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...