‘स्पाईस मनी’तर्फे ग्रामीण उद्योजकांसाठी
शून्य गुंतवणूक व्यवसायाच्या संधी
· 1 कोटी ग्रामीण उद्योजकांना सक्षम बनविण्याच्या धोरणाचा भाग म्हणून दुप्पट वेगाने प्रगती करण्याचे लक्ष्य
· डिजिटल पेमेंट्स लोकांपर्यंत नेण्याच्या सरकारच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन
मुंबई, 11 फेब्रुवारी, 2021 : ग्रामीण भागातील उद्योजकांना ‘स्पाईस मनी अधिकारी नेटवर्क’चा भाग बनता यावे, यासाठी त्यांच्याकरीता शून्य-गुंतवणूकीचा एकमेवाद्वितीय असा प्रवेश कार्यक्रम पूर्णपणे विनाशुल्क सुरू करीत असल्याचे, ‘स्पाईस मनी’ या भारतातील आघाडीच्या ग्रामीण फिन्टेक कंपनीने आज जाहीर केले. मर्यादीत कालावधीसाठी आखण्यात आलेल्या या शून्य-गुंतवणूक प्रवेश कार्यक्रमामुळे देशभरातील 1 कोटी ग्रामीण उद्योजकांना डिजिटल व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठीच्या ‘स्पाईस मनी’च्या धोरणास आकार येईल आणि निम-शहरी व ग्रामीण भागात कंपनीच्या ‘डिजिटल पेमेंट्स परिसंस्थे’ला बळकटी मिळेल.
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात, डिजिटल पेमेंटवर लक्ष केंद्रित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. या उद्दिष्टानुसारच ‘स्पाईस मनी’चे काम सुरू असून निम-शहरी व ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट्सवर अधिक भर देऊन त्यास ती प्रोत्साहित करीत असते.
या शून्य-गुंतवणूक प्रवेश कार्यक्रमातून स्थलांतरित कामगार, किराणा दुकानदार, नोकरी शोधणारे, नवीन पदवीधर, गृहिणी आणि इतरांना ‘स्पाईस मनी अधिकारी नेटवर्क’मध्ये सामील होता येईल. तसेच आपापल्या गावी त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल. ‘स्पाईस मनी’च्या नेटवर्कमधील सध्याच्या 5 लाखांपैकी 65 टक्क्यांहून अधिक अधिकारी 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तसेच त्यांतील बहुसंख्य आपल्या हक्काच्या व्यवसायाचे मालक आहेत.
‘स्पाईस मनी’चे संस्थापक दिलीप मोदी म्हणाले, “शून्य-गुंतवणूकीचा प्रवेश कार्यक्रम निम-शहरी व ग्रामीण भागातील भारतीय तरुणांना स्पाइस मनी अधिकारी बनण्यास प्रोत्साहित करेल. त्यासाठी त्यांना कोणतेही मूल्य द्यावे लागणार नाही. या कार्यक्रमामुळे ‘स्पाईस मनी नेटवर्क’चा विस्तार होईल, तसेच विशेषत: देशातील दुर्गम भागातील, बॅंकिंगची सुविधा नसलेल्या आणि अल्पविकसित लोकांकरिता अत्यावश्यक अशा डिजिटल आर्थिक आणि ई-रिटेल सेवा प्रदान करता येतील. तरुण उद्योजकांना त्यांच्या स्वतःच्या ‘डिजिटल दुकाना’च्या माध्यमातून स्वत:चे उत्पन्न मिळविण्यास मदत करून, भारताचे डिजिटल व आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये, हा कार्यक्रम हे पुढचे पाऊल आहे.”
‘स्पाईस मनी’मध्ये नुकतेच सहभागी झालेले अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते सोनू सूद म्हणाले, “स्पाईस मनी’कडील तांत्रिक कौशल्ये व डिजिटल पायाभूत सुविधा यांच्यामुळे, मला सर्व भारतीयांसाठी, विशेषत: कमी विकसित प्रदेशात राहणाऱ्यांसाठी, सामाजिक-आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे माझे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होत आहे. टाळेबंदीदरम्यान हजारो स्थलांतरित कामगारांच्या संघर्षांचा मी साक्षीदार होतो. ज्या शहरांमध्ये व गावांमध्ये हे वंचित अवस्थेतील मजूर राहतात, त्या ठिकाणीच रोजगार मिळवून देण्यासाठी पुढे येण्याची वेळ आली आहे. ‘हमें हर गांव को डिजिटली सक्षम बनाना है’. ‘स्पाईस मनी’च्या नाविन्यपूर्ण, विनामूल्य व्यवसाय प्रस्तावाद्वारे निम-शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत यशस्वीरित्या पोहोचू शकू, असा मला विश्वास वाटतो. स्वावलंबी रितीने स्वत:च्या नशिबाचे मालक होण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यास आम्ही मदत करू शकतो.”
कोविडची साथ व त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेली टाळेबंदी या काळात, मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार आणि इतर ग्रामीण लोक अडचणीत आले, बेरोजगार झाले आणि कोणतेही आर्थिक उत्पन्न त्यांना मिळू शकले नाही. या लोकांचे दुःख दूर करण्यास स्पाईस मनी व अभिनेते-सामाजिक कार्यकर्ते सोनू सूद एकत्र आले. त्यांनी ‘स्पाईस मनी, तो लाइफ बनी’ या घोषवाक्याद्वारे उद्योजकीय संधी निर्माण केल्या व लोकांना डिजिटल व वित्तीय सेवा देण्यासाठी उद्योजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे लक्ष्य गाठण्यासाठी ‘शून्य-गुंतवणूक प्रवेश कार्यक्रम’ ही एक मोठी झेप आहे.
शून्य-गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करण्याव्यतिरिक्त, सर्व विद्यमान व नवीन अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणारे भाड्याचे शुल्क ‘स्पाईस मनी’ने माफ केले आहे. उद्योजकतेचा आणि स्वावलंबनाचा त्यांचा प्रवास सुरू राहण्यासाठी यातून प्रोत्साहित देण्यात येणार आहे. आर्थिक समावेशाबद्दलच्या आपल्या धोरणास अधिक गती देण्यासाठी, या कंपनीने एक उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये अधिकाऱ्यांना (उद्योजक) कंपनीची ‘मायक्रो-एटीएम’ किंवा 'मिनी मॅजिक' डिव्हाइस ही उपकरणे सुमारे शून्य खर्चात मिळवता येतील. या उपक्रमामुळे देशातील, विशेषत: ग्रामीण भागातील एटीएमची पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होईल.
संपूर्ण देशभरात 18 हजारांहून अधिक पिन कोड्सवर, 700 हून अधिक जिल्ह्यांत व 5 हजारांहून अधिक ब्लॉक्समध्ये आर्थिक समावेशकतेचा विस्तार करण्यासाठी स्पाईस मनी युद्धपातळीवर काम करीत आहे.
‘स्पाईस मनी’विषयी :
स्पाईस मनी ही भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी आहे. तिच्या अधिपत्याखाली सुमारे 5 लाख अधिकारी (नवउद्योजक) काम करतात. त्यांच्या माध्यमातून ही कंपनी ग्राहक, एजंट व बॅंका, बॅंकेतर वित्तसंस्थेचे प्रतिनिधी यांना विविध सेवा पुरविते. या सेवांमध्ये रोख रक्कम जमा करणे, रोकड काढण्यासाठी आधारशी संलग्न यंत्रणा वापरणे, मिनी एटीएम चालविणे, विमा, कर्जे, बिलांचे पेमेंट, रोकड संकलन केंद्र उभारणे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, एअरटाईम रिचार्ज करणे, प्रवास तिकिटे काढणे, ऑनलाईन शॉपिंग, पॅन कार्ड काढणे व एमपीओएस सेवा ही कामेही कंपनी करून देते. कंपनीच्या नेटवर्कमधील 90 टक्क्यांहून अधिक व्यक्ती निम-शहरी व ग्रामीण भागांत राहतात. ’स्पाईस मनी अॅप’ (अधिकारी अॅप) आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून ‘स्पाईस मनी’च्या सेवा उपलब्ध आहेत. या यूजर-फ्रेंडली इंटरफेस व उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्मने गगल प्ले स्टोअरवर 4.4 स्टार असे मानांकन मिळवले आहे. या उद्योगातील ते सर्वात उत्कृष्ट असल्याचे मानण्यात येते. भारताच्या सर्व भागातील सर्वसामान्यांसाठी आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि स्पाइस मनी अधिकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे विविध वित्तीय सेवांमधील दरी भरून काढण्याचे काम स्पाईस मनी करीत आहे. अधिक माहितीसाठी https://spicemoney.com/ ही वेबसाईट पाहा.