Tuesday, April 2, 2019


'..बने तु..बने'चीमतदानासाठी जनजागृती

'.. बने तु.. बने' ची हाक, "मतदारा जागा हो"


        सोनी मराठीवरील '.. बने तु.. बने' ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत असते. मालिकेतील प्रत्येक भाग हा मनोरंजनासोबतच नकळत एक संदेश देऊन जातो. '..बने तु..बने'च्या या अस्सलपणा मुळेच ती प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. आता सर्वत्र निवडणूकीची धामधूम असताना अतिशय योग्य वेळ साधून '..बने तु..बने' प्रेक्षकांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा भाग प्रसारित करत आहे. एक नागरिक म्हणून आपण मतदार ओळखपत्र काढून घेतले आहे का, आपण ते व्यवस्थित हाताळतो का, आणि महत्त्वाचे म्हणजे आपला मतदानाचा हक्क बजावतो का, अशा प्रश्नांवर विनोदी कोपरखळ्या या भागात '..बने तु..बने' प्रेक्षकांना देणार आहे. आजच्या काळात ही मालिका मनोरंजनाबरोबरच नागरिकांमधे जागरुकता निर्माण करत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आपल्या मताचा फरक पडेल का, आपण मत दिलेला उमेदवार निवडून येईल, की अन्य कुणी.. असा विचार करता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे त्याकरता आपले मतदार ओळखपत्र आवर्जून बनवून घेतले पाहिजे. हाच संदेश घेऊन येत आहे '..बने तु..बने'चा खास एपिसोड "मतदारा जागा हो", उद्या एप्रिल रोजी रात्री १० वाजता, फक्त सोनी मराठीवर.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...