गोवा पर्यटन खात्यातर्फे पणजीत 'द स्पिरिट ऑफ गोवामहोत्सवास' प्रारंभ
गोव्यातही आगळीवेगळी खाद्यसंस्कृती आणि येथे तयार होणारे देशी द्रव्य यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पर्यटनखात्यातर्फे पणजीतील बांदोडकर मैदानावर 'स्पिरिट ऑफ गोवा' या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामहोत्सवाच्या उदघाटनाला पर्यटन खात्याचे साचीव जे. अशोक कुमार, संचालक संजीव गडकर, व्यवस्थापकीय संचालकनिखिल देसाई आणि मान्यवर उपथित होते.
गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या या महोत्सवाला स्थानिक तसेच राष्ट्रीय पर्यटकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षी हामहोत्सव २८ एप्रिल पर्यंतसुरु राहणार आहे. मोहोत्सवात गोव्याची ओळख असणारे विविध खाद्य पदार्थ आणि मद्याचे विविधप्रकार ठेवण्यात आले. याशिवाय येथील पारंपरिक वस्तू गोमंतकीय बाज असणाऱ्या अनेक गोष्टी या महोत्सवाच्या निमित्तानेपाहायला मिळतल्या. या मोत्सवात कार्ल फर्नांडिस अविनाश मार्टीन्स या सारख्या मास्टर्सनी मास्टरक्लास ही घेतले. या शिवायया महोत्सवात मनोरंजन, माहिती, कार्यशाळा आणि वेगवेगळ्या स्पर्धाचा अनुभव उपस्थितांना घेता आला. ज्यामुळे त्यांना भेटवस्तू आणि बक्षिसेही मिळाली. शुक्रवारपासून सुरूझालेल्या ह्या महोत्सवाला उपस्थितांनी आपली मोठ्या संख्येने उपस्थितीलावली होती. रविवारपासून या मोहोत्सवात अनेक कार्यक्रम झाले. गोवा आणि पोर्तुगालमधून आलेले गायक या दिवशीचीसंध्याकाळ जझ संगीताने रंगवली गोव्याची गायिका लॉरना हिच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST