Tuesday, April 23, 2019

             नागराज मंजुळेंचे सहपरिवार 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' मतदान 
                                                                             


नागराज मंजुळेंचा 'कोण होणार करोडपती’ हा शो लवकरच सोनी मराठीवर येत आहे. ह्या गाजलेल्या गेम शोच्या नव्या पर्वाची सर्वजण आतुरतेने वात पाहत आहेत. शोचा सूत्रसंचालक नागराजही शोच्या मूड मध्ये अगदी झिंगाट झाला आहे. आजच्या मतदानाच्या दिवसाचे औचित्य साधून तो त्याच्या शोचे प्रमोशन आणि मतदानाबद्दल जनजागृती एकत्रच करत आहे. त्याने नुकतेच मतदान करून झाल्यावर सर्व कुटुंब आणि मित्रपरिवारासोबतच्या फोटोसह 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' खेळल्याचे ट्वीट केले आहे. आपल्या जवळील मतदान केंद्रावर 'फास्ट' पोहोचून आपल्या आवडीच्या मतदारासाठीचे बटन दाबा आणि आपल्या बोटावर अभिमानाची शाई उमटवा, असेच तो आपल्याला सुचवतोय. असं म्हणतात की "उत्तर शोधलं की जगणं बदलतं”. जसं की 'कोण होणार करोडपती' मध्ये प्रत्यक्ष जाऊन जेव्हा तुम्ही 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' खेळाल तेव्हा त्या एका प्रश्नाचे उत्तर तुमचं जगणं बदलून टाकेल, त्याचप्रमाणे आजचे तुमचे मत म्हणजे तुमच्या नागरी समस्यांवर तुमचं जगणं बदलणारं उत्तर ठरू शकतं. तेव्हा नागराजप्रमाणे तुम्हीही तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' खेळून सेलिब्रेट‌ करू शकता! कारण उत्तर शोधलं की जगणं बदलतं.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...