Friday, April 19, 2019

  गायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत






गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे लताशा. हा कार्यक्रम सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्र गेली पाच वर्ष करत आहे. अमिट गोडीची मराठी गीते ह्यातून कानसेनांना ऐकायला मिळत असतात. आता पाच यशस्वी वर्षांनंतर लोकाग्रहास्तव सावनी ही क़न्सर्ट हिंदीमधून घेऊन आलीय.






सूत्रांच्या अनुसार, सावनीचा मंगेशकर कुटूंबीयांशी खूप पूर्वीपासून ऋणानुबंध आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे तिचे गुरू आहेत. त्यामूळे लतादीदी आणि आशाताईंची गाणी आणि त्यांचा अंदाज जणू सावनीच्या रक्तातच भिनलाय. लताशा मराठी कॉन्सर्ट्सना तर पंडित हृदयनाथ मंगेशकरही असतात. त्यामूळे तर कानसेनांसाठी पर्वणीच असते.






गायिका सावनी रविंद्र म्हणते, “गेली पाच वर्ष लताशा मराठीत करताना, अनेकजण मला लतादीदी आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करावा, अशी मागणी करत होती. मग मी बाबा(पंडित हृदयनाथ मंगेशकर ) ह्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या आशिर्वादाने हिंदी कार्यक्रम सुरू करायचे ठरवले. आणि पहिले दोन कार्यक्रम पूण्यात केले. तिथल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर मुंबईतल्या रसिकांसमोर कार्यक्रम सादर करायचा आत्मविश्वास आला. आणि मग आता 26 एप्रिलला दिनानाथ मंगेशकर सभागृहात हा कार्यक्रम आम्ही करत आहोत.”





कार्यक्रमाची खासियत सावनी सांगते, “ 20 वादकांच्या संचासह हा कार्यक्रम मी करत आहे. ह्या कार्यक्रमातून दीदी आणि ताईंनी भक्तीगीतांपासून अगदी कॅब्रेपर्यंत गायलेली गाणी आणि त्यांचे किस्से तुम्हांला ऐकायला मिळतील.”

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

आशीष सराफची भारतातील आरटीएक्स च्या प्रॅट अँड व्हिटनी व्हाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड म्हणून नियुक्ती

आशीष सराफची भारतातील आरटीएक्स च्या प्रॅट अँड व्हिटनी व्हाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड म्हणून नियुक्ती या नवीन भूमिकेत आशीष भारतातील सर्व प्र...