Wednesday, April 24, 2019

निशांतसिंह मलकानीतील गुप्त कलागुण!



‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेतील कठोर आणि निश्चयी अक्षत जिंदालची भूमिका समर्थपणे रंगविणा र्‍्या निशांतसिंह मलकाणीने असंख्य प्रेक्षकांची मने जिंकून आपल्या अभिनयाबद्दल त्यांची वाहवा मिळविली आहे. निशांतसिंह हा एक कसलेला अभिनेता आहे, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसली, तरी तो एक उत्तम चित्रकारही आहे, ही गोष्ट फारच थोड्यांना ठाऊक असेल. या मालिकेतील एका भावनाप्रधान प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी निशांतसिंहमधील या आजवर गुप्त असलेली कलागुण सर्वांसमोर उघड झाले, तेव्हा त्याची कला पाहून सर्व कलाकार आणि कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. या प्रसंगात गुड्डन (कनिका मान) आणि त्याच्यातील संबंध एका चित्राद्वारे तो स्पष्ट करतो, अशी संकल्पना होती. यावेळी हे चित्र आपणच काढू, असे त्याने सांगितले आणि सर्वांना चकित केले.

आपल्या या चित्रकारितेच्या प्रसंगाबद्दल निशांत सिंह म्हणाला, “या प्रसंगात अक्षत जिंदाल गुड्डनला समजावतो की सर्व संबंधांची सुरुवात मैत्रीच्या नात्याने होते. मला जेव्हा हा प्रसंग समजावून सांगण्यात आला, तेव्हा त्यात मी एक चित्र काढतो, असं सुचविण्यात आलं होतं. ते ऐकून मी मनातल्या मनात सुखावलो कारण मला रेखाचित्रं काढायला फार आवडतात. मी शाळेत असताना अनेक आंतरशालेय चित्रकला स्पर्धांमध्ये मी बक्षिसं मिळविली आहेत. लहानपणी मला चित्रं काढायला फार आवडायची. या प्रसंगाच्या चित्रीकरणाने मला पुन्हा एकदा माझ्या बालपणात नेलं. मी काढलेल्या त्या छोट्या रेखाचित्राने सेटवरचे सर्वजण एकदम खुश झाले!”

निशांत हा खरोखरच एक बहुगुणी कलाकार आहे. त्याच्या या सुप्त गुणांवर आम्हीही खुश झालो असून आम्हलाही त्याचे हे चित्र मालिकेत कधी बघायला मिळेल, असे झाले आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...