Wednesday, April 24, 2019

‘कुक फॉर मी’ अनोखी पाककृती स्पर्धा

१०० हून अधिक स्पर्धक सहभागी, ३० अंतिम स्पर्धकांची निवड


नवी मुंबई, २२ एप्रिल २०१९: रंगतदार ‘कुक फॉर मी’ स्पर्धा वंडरशेफ होम अप्लायन्सेस तर्फे नवी मुंबई येथील सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल, नवी मुंबई येथे २० एप्रिल २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. १०० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यातून ३० अंतिम स्पर्धक निवडण्यात आले. या ३० अंतिम स्पर्धकांनी आपले सर्व पाककौशल्य पणाला लावून लज्जतदार आणि अनोख्या अशा पाककृती दिग्गज शेफ संजीव कपूर यांच्यापुढे सादर केल्या. संजीव कपूर यांनी या सर्व रुचकर आणि खमंग डिशेस चाखल्या आणि या ३० अंतिम स्पर्धकांमधून एका विजेत्या ‘वंडरशेफ’ची निवड केली.




खवय्यांसाठी शेफ्सनी वेगवेगळ्या पाककृती बनवणे हे काही नवीन नाही पण ह्या वेळेस आपल्या सगळ्यांना थोडे वेगळे चित्र पाहायला मिळाले. आज आपले शेफ्स खवय्यांसाठी नाही, तर सगळ्यांचे लाडके सेलिब्रेटी शेफ संजीव कपूर यांना आपल्या पाककृतीने खूश करण्यासाठी सिद्ध झाले होते. हे चित्र पाहायला मिळाले, नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘कुक फॉर मी’ या स्पर्धेच्या वेळी.


‘कुक फॉर मी’ ही अनोखी पाककृती स्पर्धा खास हौशी शेफ्स आणि खवय्यांच्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वंडरशेफ होम अप्लायन्सेसने आयोजित केली होती. सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी उद्योजक रवी सक्सेना आणि शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते वंडरशेफच्या नवीन उत्पादन श्रेणीचे उद्घाटनही करण्यात आले. 

शेफ संजीव कपूर यावेळी म्हणाले, “वंडरशेफ आणि आरोग्यदायी स्वयंपाक बनवण्याबाबतीत मुंबईकरांमध्ये असलेला उत्साह आणि जोश पाहून मला खूप आनंद झाला आहे. आपल्याकडील पाककला संस्कृती विकसित होत असून यासाठी दर्जात्मक कुकवेअर अर्थात स्वयंपाकाच्या भांड्याचा वाढता वापर पाहून मला खूप आनंद होत आहे. नाविन्यपूर्ण आणि आरोग्यदायी उपकरणांचा वापर करून अधिक चांगले अन्न शिजवायला महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वंडरशेफ कटिबद्ध आहे.”





वंडरशेफचे व्यवस्थापकीय संचालक, रवी सक्सेना म्हणाले, “वंडरशेफ हा देशात सर्वात अधिक लोकप्रियता लाभलेला कुकवेअर आणि अप्लायन्सेस ब्रँड आहे. ही लोकप्रियता आणि बाजारातील अग्रगण्य स्थान टिकवून ठेवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यासाठीच आम्ही ही नवीन उत्पादन श्रेणी बाजारात आणली असून आरोग्यदायी अन्नपदार्थ शिजवण्यासाठी त्यांचा फायदा होऊ शकेल. ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने देण्याच्या आमच्या ध्येयाप्रति आम्ही बांधील असून भारतातील किचनवेअर इंडस्ट्रीमधील सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...