Wednesday, April 17, 2019

गोवा टुरिझमचे व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हल प्रचंड यशस्वी


पणजी१७ एप्रिल – गोवा टुरिझमने १४ एप्रिल २०१९ रोजी आयनॉक्स कोर्टयार्डपणजी येथे गोवा व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हल आयोजित केला होताव्हिटेंज कार आणि बाइक्स जमवण्याची त्यांचे जतन करण्याचा ध्यास साजरा करण्याच्या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.


  

यादरम्यान आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये १८ व्या शतकातील काही सर्वोत्तम कार आणि बाइक्स पाहायला मिळाल्यागोव्याच्या विविध भागांतून तसेच त्याजवळच्या राज्यांतूनही कित्येक व्हिंटेज कार्सआणि मोटरसायकल्स यामध्ये सहभागी झाल्या होत्याकार्यक्रमस्थळ ४५ कार्स आणि ७० बाइक्स प्रदर्शनार्थ मांडण्यात आल्या होतागोव्याच्या राज भवनाने जतन केलेली कॅडलॅक लिमोझिनचे१९५९ मधील मॉडेल प्रेक्षकांचे सर्वात आवडते बनले.



  


व्हिंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआययांच्या सहकार्याने आयनॉक्स कोर्टयार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या २०१९ गोवा व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हलचेउद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य निवडणूक अधिकारीश्रीकुणाल यांनी गोवा टुरिझमचे सचिव श्रीजेअशोक कुमार यांच्यासहउत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आरमनेकाटुरिझमचे संचालक श्रीसंजीव गडकरइंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष श्रीविवेक गोएंकाऑटोकार मासिकाचे सल्लागार श्रीबर्सिस बांद्रावाला आणि कार्यक्रमाचे आयोजकअशोक व्हिंटेजवर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक श्रीप्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या व्हिंटेज कार्स आणि बाइक्सनी कंपाळ आणि मीरामार बीच सर्कलवरून मांडवी नदीच्या काठाने रॅली काढली आणि परत पणजीमध्ये आले  पुढे अब्बे फॅरिया पुतळ्यावरून (जुने सचिवालययूटर्न घेत परत आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये डिस्प्लेसाठी परतले.





आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर आणि गोव्याच्या निवडणूक आयोगाचे आयकॉन वर्मा डिमिलो यांनी गायिका मेरी जो यांच्यासह प्रेक्षकांसाठी खास फॅशन शोचे आयोजन केले होतेत्यात कुणबी हेगोव्याचे पारंपरिक वस्त्र प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आले होतेगोव्याचा लोकप्रिय बँड क्रिमसन टाइडने धमाकेदार नृत्य सादरीकरण केलेयावेळेस खाद्यपदार्थ आणि पेयांचे स्टॉल्सही उपलब्धहोते.




मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मतदार जागृतीन्याय्य मतदानाबद्दल प्रचार करण्यासाठी #सेव्हदडेट आणि #गोव्होट या खास अभियानांचा प्रचारकरण्यासाठी गोवा टुरिझमसह सहकार्य केले२३ एप्रिल २०१९ रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी त्यांनी कार्यक्रमस्थळी सेल्फी पॉइंट्स आणि बॅनर्सच्या मदतीने जनजागृती केली.



या कार्यक्रमाचे आयोजन अडव्हर्टायझिंग असोसिएट्स आणि क्युरेटेड बाय अशोक व्हिंटेज वर्ल्डसपोर्टेड बाय व्हिंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआययांनी देशातीलआघाडीचे वाहनउत्पादन मासिकऑटोकार हे मीडिया भागीदार या नात्याने विवा गोवा लाइफस्टाइल मासिक भागीदार म्हणून केले होते.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...