Tuesday, April 23, 2019

येत्या २६ ते २८ एप्रिल २०१९ दरम्यान गोवा टुरिझमच्या  स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल २०१९ चे आयोजन


पणजी, २२ एप्रिल – २६ ते २८ एप्रिल २०१९ दरम्यान  स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हलच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज झाले असून गोवा फेणी डिस्टिलियर्स अँडबॉटलर्सच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात येणार आहे.

हा तीन दिवसीय महोत्सव गोव्याचे आवडते खाद्यपदार्थ म्हणजेचनारळकाजूपासून बनवलेली विविध उत्पादनेखाद्यपदार्थपेयेहस्तकलेच्या वस्तू इत्यादींवर आधारित आहेया पदार्थांचेपारंपरिक पैलू आणि चांगले गुणधर्म तसेच त्याच्याशी संबंधित पूरक उत्पादने आणि पेये प्रदर्शित केली जाणार असून त्यामध्ये फेणीउरकस्थानिक पेयेलिकर्सघरगुती वाइन यांचा समावेश असेल.

 स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल २०१९ मध्ये काजूरसाचे डिस्टिलिंगचे होऊन गोव्याची आवडती आणि वारशाने चालत आलेली फेणी कशी बनते याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहेअस्सल गोवनखाद्यपदार्थांशिवाय नारळ आणि काजू या तीन दिवसीय महोत्सवादरम्यान बनवले जाणारे खाद्यपदार्थ आणि पेयांचा मुख्य घटक असेलयावेळेस कॅश्यू स्टॉम्पिंग (काजू तुडवणेस्पर्धा घेतली जाणारआहेत्याशिवाय कार्ल फर्नांडिस यांच्यासारखे व्यावसायिक मिक्सॉलॉजिस्ट आणि प्रसिद्ध व्यावसायिक यांच्यातर्फे आणि खाद्यपदार्थांच्या प्रात्यक्षिकासह मास्टरक्लास घएतील आणि शेफ अविनाशमार्टिन्स  टिझ मार्टिन्स अस्सल तरीही नाविन्यपूर्ण गोवन खाद्यपदार्थ दाखवणार आहेत.

या महोत्सवादरम्यान प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी विविध आकर्षक उपक्रममनोरंजनकार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून भरपूर बक्षिसे  सरप्राइजेसही ठेवण्यात आलीआहेत

प्रत्येक गोयंकराच्या मनात दडलेल्या संगीतप्रेमी रसिकाला चालना देण्यासाठी स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल एंटरटेनमेंट आयोजित करण्यात आले आहेकालातीत कोंकणी आणि पोर्तुगीज अभिजातसंगीतापासून आधुनिक इंग्रजी लॅटिन शैलीचे जॅझ  फंक रिदमसह संगीत यात ऐकायला मिळणार आहेमहोत्सवात भव्य सादरीकरण आणि आतापर्यंत कधी  पाहायला मिळालेला पूर्ण ब्रास सेक्शनअनुभवता येणार आहे.

   पहिला दिवसशुक्रवार २६ एप्रिल – या दिवशी व्हॅलेंटिनोसचे सादरीकरण आणि अस्सल पारंपरिक गोवन नृत्य पाहायला मिळणआर असून त्यानंतर १५ संगीतकार  गायकांचा समावेश असलेले टेक एन्सेम्बल सादर केले जाणार आहेविशेष म्हणजेयात हॉर्न सेक्शनव्हायोलिन सेक्शनफ्लुट गिटार्सकोरस गायक आणि काही आघाडीचे गायक असा पूर्ण सेट असेल
 
दुसरा दिवसशनीवार २७ एप्रिल – या दिवशी क्ले जार्स नावाचा गोव्यातील सर्वात लहान ड्रमरचा आणि इतर तरुणगुणवान कलाकारांचा समावेश असलेला गोवन संगीताचा समूह ते  युनिटनावाच्या नृत्य समूहासह फ्युजन सादरीकरण करणार आहेतया सादरीकरणानंतर मंचावर विविध कथा सादर करतीलत्यांच्या सादरीकरणानंतर व्हायोलिन्ससेलासह पूर्ण ब्रास१४ संगीतकार गायकांचा समावेश असलेले  कॉफी कॅट्स एन्सेम्बल आपली कला सादर करतीलअशाप्रकारचे भव्य सादरीकरण गोव्यात कदाचित पहिल्यांदाच सादर होत असावे.

तिसरा दिवस२८ एप्रिल – यादिवशी जॅझ जंक्शन त्यांचा लॅटिन ताल आणि जॅझ फंकसह मंच उजळवणार असून त्यामध्ये गोवा  पोर्तुगालमधील पाहुण्या गायकांचा समावेश असेल.
 फिनालेमध्ये गोव्याचे लेजंड म्हणून ओळखले जाणारे लोर्ना लाइव्ह सादरीकरण करत या तीन दिवसीय महोत्सावाची योग्य सांगता करतील.

महोत्सवामध्ये लाइव्ह अकॉस्टिक ब्रास बँड्सही समाविष्ट असल्यामुळे स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल २०१९ च्या दिमाखात आणखी भर पडेल.

महोत्सवात एक भव्यडिजिटली मॅप केलेला स्क्रीन अस्सल गोवन संकल्पनांवर आधारित थ्रीडी पार्श्वभूमी दर्शवत राहाणार असून त्यामुळे सर्व प्रेक्षकांना नेत्रसुखद पर्वणी मिळेलमहोत्सवाच्याठिकाणी एक प्रवेशद्वार आणि एक निर्गमन द्वारासह मोफत पार्किंग सुविधा ठेवण्यात आली आहेपार्किंगसाठी जागा नसल्यास प्रेक्षकांनी परेड मैदान वापरावे असे आवाहन करण्यात आले असूनट्रॅफिक पोलिसांनी सर्व कार चालकांना आपल्या गाड्या पदपथावर  लावण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...