Friday, July 26, 2019

‘बिग बॉस मराठी-1’ कंटेस्टंट आस्ताद काळे, रेशम टिपणीससह शरद केळकरनेही दिल्या माधव देवचकेला शुभेच्छा

‘बिग बॉस मराठी-1’ कंटेस्टंट आस्ताद काळे, रेशम टिपणीससह शरद केळकरनेही दिल्या माधव देवचकेला शुभेच्छा

बिग बॉस मराठी-1 कंटेस्टंट आस्ताद काळे, रेशम टिपणीससह शरद केळकरनेही दिल्या माधव देवचकेला शुभेच्छा
बिग बॉस कंटेस्टंट माधव देवचकेला बिग बॉसच्या घरात राहून दोन महिने झाले आहेत. आणि आता शेवटच्या महिन्यातही त्याने घरात राहावे, म्हणून माधवचे फिल्म इंडस्ट्रीतले अनेक मित्र त्याच्यासाठी उभे राहिले आहेत. माधवच्या जवळच्या मित्रांपैकी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातले स्पर्धक रेशम टिपणीस आणि आस्ताद काळे बिग बॉस-11 मधला कंटेस्टंट पुनीश शर्मा आणि अभिनेता शरद केळकर ह्यांनी माधवला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माधवच्या सिनेसृष्टीतल्या यशस्वी अभिनय कारकिर्दीत त्याने अनेक मित्र जोडले. त्याच्या सगळ्या मित्रांना आता आपला लाडका मित्र ह्या आठवड्यात सेफ व्हायला हवाय. सोशल मिडीयावरून सध्या माधवच्या ह्या मित्रांकडून आणि चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
अभिनेता शरद केळकर म्हणतो, माझा खूप छान मित्र माधव देवचके बिग बॉसमध्ये आहे. आणि तो घरात राहण्यासाठी त्याला तुम्ही भरभरून वोट करा.
बिग बॉसच्या पहिल्या पर्वातला कंटेस्टंट आणि अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, बिग बॉस मराठीमध्ये माझा मित्र माधव देवचके नॉमिनेटेड आहे. ह्या प्रवासात त्याने पूढे जाण्यासाठी त्याला मतं द्या.
बिग बॉसच्या पहिल्या पर्वातली कंटेस्टंट आणि अभिनेत्री रेशम टिपणीस म्हणते, माधव आता खूप उत्तमरितीने खेळू लागलाय. आणि सध्या तो नॉमिनेटेड आहे. त्यामुळे माधवला मत देऊन वाचवा. म्हणजे तो घरात राहिल आणि आपल्याला चांगला गेम खेळून एन्टरटेन करू शकेल.”  
माधवच्या चाहत्यांनीही वेळोवेळी त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचेच कौतुक केले आहे. सुत्रांच्या अनुसार, सहनशक्ती टास्क’ मध्ये आपल्या खिलाडूवृत्तीमूळे कॅप्टन झालेल्या माधवने आपल्या संमजंस स्वाभावाने अनेक चाहते कमावले आहेत. ह्या आठवड्यातही एकला चलो रे’ या नॉमिनेशन टास्कमध्ये इतर स्पर्धक डिवचायचा प्रयत्न करत असतानाही माधव तिसऱ्या राउंड पर्यंत टिकून राहिला होता. क्रिकेट,कबड्डीस्विमिंग अश्या विविध खेळांमध्ये अव्वल असलेल्या माधवने आपल्या स्पोर्ट्समन स्पिरिटचं वेळोवेळी दर्शन घडवून दिलंय.
बिग बॉसचे खेळ शांत राहूनयुक्तिवादाने खेळू शकतो हे माधवने वेळोवेळी दाखवून दिलंय. बिग बॉसच्या अनसीन अनदेखा मध्ये तो म्हणालाय, बिग बॉसमध्येन भांडणेशांत राहणे हे माझ्यासाठी सगळ्यात मोठे चॅलेंज होते. पण इथे आल्यापासून मी स्वतःला बरच कंट्रोलमध्ये ठेवलं आहे. माझा राग कमी झालाय. मी भांडत नाही.” 
माधवचा दिवसेंदिवस उत्तमोत्तम होत चाललेला खेळ सध्या सगळे पाहत आहेत. केवळ सिनेसृष्टी नव्हे तर त्याच्या चाहत्यांनाही वाटते कि माधव स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तो टॉप ५ मध्ये सहज पोहचू शकेल. माधवला मिळत असलेला पाठिंबा पाहता ही चाहत्यांची इच्छा सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...