Monday, July 22, 2019

बिग बॉस मराठीच्या कंटेस्टंट्सनी दिल्या वैशाली म्हाडेच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिग बॉस मराठीच्या कंटेस्टंट्सनी दिल्या वैशाली म्हाडेच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिग बॉस मराठीच्या कंटेस्टंट्सनी दिल्या वैशाली म्हाडेच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
महागायिका वैशाली म्हाडेच्या मुलीचा आस्थाचा 19 जुलैला वाढदिवस होता. यंदा पहिल्यांदाच वैशाली आपल्या मुलीच्या वाढदिवसाला तिच्यासोबत नव्हती. आणि ही खंत वैशालीने बिगबॉसच्या घरात जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच व्यक्त केली होती. 19 जुलैला वैशालीने सर्व घरच्यांसोबत मिळून आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .

वूटवरच्या ह्या अनसीन व्हिडीयोमध्ये वैशाली म्हणाली, “आज माझ्या मुलीचा अकरावा वाढदिवस आहे. हा दिवस माझ्यासाठी वर्षभरातला एक महत्वाचा दिवस असतो. तो माझ्यासाठी एखाद्या सणासारखाच असतो. सगळ्या सणांपेक्षा मोठा सण म्हणजे आस्थाचा वाढदिवस. आणि आज तिच्यासोबत वाढदिवस साजरा करायला मी नाही. ह्याचं मला दु:ख वाटतं. पण लवकरच मी तिला भेटेन. यंदा मी तिला नवीन मामा आणि मावश्या ह्या रिएलिटी शोमधून घेऊन येणार आहे. आणि मी बाहेर आल्यावर वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी नक्की पून्हा एकदा पार्टी करू.”

वैशाली म्हाडेसोबत किशोरी शहाणे-विज, शिव ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, माधव देवचके, शिवानी सुर्वे, हिना पांचाळ, रूपाली भोसले ह्यांनीही बर्थ-डे साँग गाऊन आस्थाला शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...