Monday, July 22, 2019

गायिका सावनी रवींद्रने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस

गायिका सावनी रवींद्रने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस


गायिका सावनी रवींद्रने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस
सुमधूर आवाजाची गायिका सावनी रविंद्रचा 22 जुलैला वाढदिवस असतो. संवेदनशील गायिका सावनी आपल्या फिल्मइंडस्ट्रीतल्या मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सामाजिक सेवा करून आपला खास दिवस दरवर्षी साजरा करते.

चार वर्षांपूर्वी सावनीने मुंबईमध्ये कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वाढदिवस साजरा केला होता. तर त्यांनतर तीन वर्ष ती पुण्यातल्या मातोश्री वृध्दाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करत होती. आता यंदा आपला वाढदिवस सावनीने मुंबईतल्या भिन्नमती मुलांच्या सुलभा स्पेशल स्कुल’ मध्ये जाऊन साजरा केला.

सावनी रविंद्र अशा वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याबाबत सांगते, फक्त पार्टी करून आणि गिफ्ट्स घेऊन वाढदिवस साजरा करणे, मला कधीच आवडले नाही. माझ्या वाढदिवशी कोणातरी गरजु व्यक्तिच्या चेह-यावर हसु फुलवावे, आणि त्या व्यक्तिला आवश्यक भेटवस्तू द्यावी असे मला फार पुर्वी पासूनच वाटायचे. आणि मग त्यातूनच मी वाढदिवस अशा वेगळ्या पध्दतीने दरवर्षी साजरा करयचा संकल्प सोडला. जो दरवर्षी मी पूर्णही करतेय, ह्याचा अर्थातच मला आनंद आहे.

सुलभा स्पेशल स्कुलच्या विद्यर्थ्यांसोबत वेळ घालवल्याच्या अनुभवाबद्दल सावनी सांगते, खरं तर मी ह्या विद्यार्थ्यांना सरप्राइज द्यायला इथे आले होते. पण त्यांनी तर मलाच सरप्राइज केले. माझ्यासाठी त्यांनी गाणी गायली, डान्स केला. त्यांच्यातली निरागसता मला खूप भावली. त्यांचे निखळ हास्य माझ्या वाढदिवसाचा आनंद व्दिगुणीत करून गेला. त्यांनी दिलेली उर्जा आता वर्षभर चांगलं काम करण्याची उमेद मला देत राहिल,”  



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...