Tuesday, July 23, 2019

रविवार 28 जुलै 2019 रोजी जीटीडीसीचा मान्सून ट्रेक जाणार पाली धबधबा येथे

रविवार 28 जुलै 2019 रोजी जीटीडीसीचा मान्सून ट्रेक जाणार पाली धबधबा येथे 

प्रेस रीलीज

रविवार 28 जुलै 2019 रोजी जीटीडीसीचा मान्सून ट्रेक जाणार पाली धबधबा येथे


पणजी, 23 जुलै 

 गोवा पर्यटन विकास महामंडळाने येत्या रविवारी म्हणजेच 28 जुलै 2019 रोजीआणखी एका धमालअविस्मरणीय अनुभव देणाऱ्या ट्रेकचं आयोजन केलं आहे.

पाली येथील धबधब्याच्या ठिकाणी जाणार असलेल्या या चार किलोमीटर अंतराच्या ट्रेकदरम्याननिसर्गरम्य लँडस्केप्स पाहायला मिळतातगावापासून या ठिकाणी जाण्यासाठी 60 ते 90 मिनिटेचालत जावे लागतेपालीचा धबधबा शिवलिंग धबधबा या नावानेही ओळखला जातोकारण दगडांवरूनपडणारं पाणी शिवलिंगाप्रमाणे दिसते.

हा ट्रेक तुलनेने सोपा आणि तरीही साहसी आहेवाटेत जंगलातून वाहाणारे झरेविविध प्रकारचीफुलपाखरं आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतोया ट्रेकदरम्यान काही ठिकाणी तीव्र चढ तसेचनिसरड्या खडकांचं वर्चस्व आहे.

तेव्हा तुमची ट्रेकिंग बॅग भरा आणि या सोप्य तरीही साहसी ट्रेकदरम्यान निसर्गाची जादूअनुभवण्यासाठी चला.

हा ट्रेक सर्वांसाठी विशेषतः साहस आणि निसर्गप्रेमींसाठी खुला आहे.

वाहतुकीची सोय म्हापसा रेसिडेन्सी रेसिडेन्सीपासून सकाळी 7.30 आणि मडगाव रेसिडेन्सीपासून 7.15वाजतातर पणजी येथून सकाळी 8.30 वाजता करण्यात आली आहेजुना गोवाबाणस्थरी आणिसांखली येथूनही वाहतुकीची सोय ठेवण्यात आली आहे.



इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपड्यांचा एक जादा जोडरेनीवेयरट्रेकिंग शूजखाद्यपदार्थदुर्बीण आणावी.धूम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.

यासाठीचे शुल्क प्रती व्यक्ती 800 रुपये असून त्यात जेवणप्रवास आणि गाइडच्या खर्चाचा समावेशआहे.

कृपया नोंद घ्यावी – शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनी हा ट्रेक करू नये.

आरक्षणासाठी संपर्क : श्रीअनिल दलालजीटीडीसी – 9422057704/ 8379022215
ऑनलाइन आरक्षणासाठी भेट द्या - goa-tourism.com

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...