Thursday, July 11, 2019


करीना म्हणजे पटाखा - करिष्मा कपूर सांगते
डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’ कार्यक्रमात करिष्माने केले बहीण करीनाचे खट्याळ रूप उघड



‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’ या सर्वात मोठ्या नृत्यविषयक गुणवत्ता शोध कार्यक्रमातील 14 स्पर्धकांनी सादर केलेल्या अफलातून नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने काबीज करण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडची सुपरस्टार रूपसुंदर अभिनेत्री करीना कपूर-खान, नृत्याचा महान गुरू बॉस्को मार्टिस व भारतातील सर्वात लोकप्रिय रॅपर रफ्तार यांनी या कार्यक्रमात परीक्षकाचे काम स्वीकारले असून त्यांच्यातील खेळीमेळीचे नाते आणि सूत्रसंचालक करण वाही याच्या चेष्टेखोर टिप्पण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते.

या आठवड्याचत प्रेक्षकांना मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे; कारण करीना कपूर-खानच्या ऐवजी तिची बहीण आणि बॉलीवूडची माजी सुपरस्टार सौंदर्यवती करिष्मा कपूर ही अतिथी परीक्षक म्हणून या वीकेण्डच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

या भागाची संकल्पना नृत्याच्या क्षेत्रातील महान कलाकारांना आदरांजली अशी असून त्यामुळे सर्वच स्पर्धकांनी काही अप्रतिम नृत्याविष्कार सादर केले आणि कार्यक्रमाची रंजकता एका नव्या उंचीवर नेली. एक स्पर्धक रिचिकाने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘ले गयी ले गयी’  या गाण्यावर सादर केलेल्या अप्रतिम नृत्य पाहून करिष्मालाही राहावले नाही आणि तिनेही या 10 वर्षांच्या स्पर्धक नर्तकीबरोबर व्यासपिठावर नृत्य केले.


त्यानंतर रिचिकाने करिष्माला आपली बहीण बेबो (म्हणजे करीना कपूर-खान) हिच्या बालपणीच्या काही आठवणी सांगण्याची विनंती केली. तेव्हा करिष्माने करीनाबद्दल सांगितलेल्या खट्याळ आठवणींनी सर्वजण थक्क झाले! करिष्मा कपूर म्हणाली, “शाळेत असताना मी अगदी संयमी विद्यार्थिनी होते आणि सर्वजण मला‘मिस गुडी टू शूज’  म्हणून संबोधायचे. मी अगदी शिस्तप्रिय मुलगी होते, पण करीना एकदम पटाखा होती. ती खूपच खट्याळ होती आणि ती नेहमी कुठेतरी पळून जात असे आणि आम्ही तिला शोधत फिरत असू. मी अगदी साधी असून माझ्या अगदी उलट करीना आहे. पण ते म्हणतात ना, विरुध्द स्वभावाच्या व्यक्तींना एकमेकांचं आकर्षण वाटतं. म्हणूनच आम्ही दोघी एकमेकींच्या अगदी जवळ आहोत.”

लोलो आणि बेबो या बहिणींमधील हे प्रेमाचे नाते निश्चितच प्रशंसनीय म्हटले पाहिजे! याशिवाय या वीकेण्डच्या भागात अनरिअल क्र्यू या स्पर्धकांकडून प्रेक्षकांना ‘मार डाला’  या गाण्यावर, तर ‘इन आँखों की मस्ती में’  या गाण्यावर सोल क्वीन यांचा नृत्याविष्कार पाहायला मिळेल. तसेच या स्पर्धकांबरोबर आपल्या काही लोकप्रिय गाण्यांवर करिष्मा कपूरही पदन्यास करून सर्वांना थक्क करून सोडणार आहे


ही सर्व धमालमस्ती, संस्मरणीय क्षण आणि असामान्य नृत्याविष्कार पाहण्यासाठी पाहात राहा ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’च्या शनिवार-रविवार रात्री 8.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...