Tuesday, July 23, 2019

शेरनी शिवानी सुर्वे बनली बिग बॉसच्या घराची कॅप्टन

शेरनी शिवानी सुर्वे बनली बिग बॉसच्या घराची कॅप्टन

शेरनी शिवानी सुर्वे बनली बिग बॉसच्या घराची कॅप्टन

बिग बॉसच्या घरात एका आठवड्यापूर्वी परतलेली शिवानी सुर्वे आता बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनली आहे.  शिवानीचा घरात प्रवेश होताना बिग बॉसने तिला पाहुणी म्हणुन घरात पाठवले होते. पण शिवानी सुर्वेने केलेली उत्तम कामगिरी पाहता बिग बॉसने शिवानीला घराचे सदस्यत्व बहाल केले. ह्या संधीचे सोने करत शेरनी शिवानी सुर्वेने कॅप्टनपद पटकावले.
शिवानीला पून्हा एकदा सदस्यत्व बहाल करताना बिग बॉस म्हणाले, गेल्या आठवड्याभरातल्या कार्यात दिसलेला सकारात्मक वावर, उत्साहपूर्ण सहभाग आणि कार्यातील कामगिरी ह्या बाबी लक्षात घेता बिग बॉसच्या घरातल्या सदस्यत्वाचा दर्जा शिवानीला दिला जात आहे.

ह्या सदस्यत्वानंतरच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल हे कॅप्टनसी कार्य रंगले. मर्डर मिस्ट्री कार्यात सर्वात चांगली कामगिरी करणा-या अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये हे कॅप्टनसी कार्य रंगले. लिलिपूटच्या राज्याच्या ह्या कार्यात महाकाय मानव बनलेल्या शिवानीने आपल्या प्रतिमा सुरक्षित ठेवून चांगली कामगिरी केली. अभिजीतच्या सर्व प्रतिमा शिवानीच्या टीमने नष्ट केल्या.  आणि शिवानी विजयी ठरून कॅप्टन बनली.
सूत्रांच्या अनुसार, बिग बॉसमध्ये पहिलं पाऊल ठेवतानाच शिवानीने ती एक स्ट्राँग कंटेस्टंट असल्याचेच सर्वांना दाखवून दिले होते. तब्येतीच्या कारणास्तव तिला 21 दिवसांमध्येच घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडावे लागले होते. पण परतताना शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या फिट होऊन 28 दिवसांनी परतलेल्या शिवानीने पहिल्या दहाच दिवसांत पून्हा एकदा चांगल्या परफॉर्मन्सने बिग बॉसची वाहवाही मिळवली. म्हणूनच बिग बॉसनेही तिला सदस्यत्व बहाल केले. आणि ती किती स्ट्राँग खेळाडू आहे, हे तिने लगेच कॅप्टनसी टास्क जिंकुन दाखवले. सध्या शिवानीवर तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षीव होत आहे.  आता शिवानी बिग बॉस-2 ची  विनर बनू शकते. शिवानीचे चाहतेही सध्या सोशल मीडियावरून शिवानीच्या यशासाठीच तिला शुभेच्छा देत आहेत.  

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...