Monday, July 15, 2019

शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री

शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री


शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पून्हा एकदा एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या दूस-या पर्वात दणक्यात एन्ट्री घेऊन बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमधला पहिला महिना गाजवणारी शिवानी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसमधून बाहेर पडली होती. पण आता पूर्ण बरी झालेली शिवानी सुर्वे बिग बॉसमध्ये शुक्रवारी परतलीय.

बिग बॉसच्या घरात पुनरागमन केलेल्या शिवानीची एन्ट्री नाट्यमय अंदाजात झाली. बिग बॉसमध्ये परतताना शिवानीने बिग बॉसमधल्या इतर स्पर्धकांसाठी पेस्ट्रीज आणल्या. घरच्यांनीही तिचे हसतमुखाने स्वागत केले. परतताना मात्र शिवानी कन्टेस्टंट म्हणून नाही, तर घरातली पाहूणी बनून आलेली आहे.
शिवानीची एन्ट्री जशी बिग बॉसच्या घरच्यांसाठी आनंददायी होती तशीच तिच्या चाहत्यांसाठीही हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. शिवानीच्या चाहत्यांनी कलर्स मराठीच्या पेजवर आपल्या भरघोस प्रतिक्रियांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. वेलकम बॅक’ , ‘शिवानी परत आली’, ‘वाघीण परत आलीये’ अश्या भरपूर शुभेच्छांचा वर्षाव सातत्याने सोशल मीडियावर होत आहे.


सूत्रांच्या अनुसार, शिवानी ही बिग बॉसच्या यंदाच्या पर्वातली खूप स्ट्राँग स्पर्धक होती. ती बिग बॉसमध्ये असावी, असं बिग बॉस पाहणा-या अनेक प्रेक्षकांचे मत होते. शिवानीला प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडायला लागल्यावर अनेक चाहत्यांची निराशा झाली होती. तशा प्रतिक्रियाही सातत्याने प्रेक्षक नोंदवत होते. आता बिग बॉसमध्ये शिवानीची पून्हा एन्ट्री झाल्यावर हा खेळ नक्कीच अधिक मजेशीर होत जाणार आहे. हे विकेन्डच्या  वारमधून लक्षात आलंच आहे.  सध्या बिग बॉसमध्ये खूप मत-मतांतरं होत आहे. नवे ग्रुप बनत आहेत. अशावेळी आता शिवानीच्या एन्ट्रीने हा शो खूप मनोरंजक होईल यात शंका नाही.  

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...