Monday, July 8, 2019

जीटीडीसी मान्सून ट्रेक रविवार 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथे

Goa tourism logo new.png
प्रेस रीलीज


जीटीडीसी मान्सून ट्रेक रविवार 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथे


पणजी, 8 जुलै – जीटीडीसीचा यंदाच्या हंगामातील चौथा रविवार मान्सून ट्रेक 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथेजाणार आहे.

या रविवारच्या ट्रेकचा कार्यक्रम विविध आकर्षणांनी भरलेला असून त्यात इतिहास आणि साहस यांचं अनोखं मिश्रणअनुभवायला मिळणार आहेपहिल्यांदा सत्तारी आणि त्यानंतर नागरगाव येथे पोहोचून मग बुद्रुक शेलॉप गाठायचेआहेतिथे ब्रम्हदेवाचे एक प्राचीन मंदिर पाहायला मिळते. 16 व्य शतकात करमाली ही स्थानिक देवतासत्तारीमध्ये स्थलांतरित करण्यात आली होतीत्यानंतर आपल्याला चार किलोमीटरचा ट्रेक करायचा असूनत्यादरम्यान 3 झरे आणि एक मोठा धबधबा पाहायला मिळतोशेळाप्याच्या गावकऱ्यांद्वारे रूचकर जेवण बनवलेजाणार आहेपरतीच्या मार्गावर सर्व ट्रेकर्सना मोफत रोप दिले जाणार आहे.  

बुद्रुक शेलॉप हे सत्तारी तालुक्यातील वाल्पोईगोव्याजवळ पाहायला मिळणारे छोटेहंगामी धबधबे असून हापरिसर जैवविविधतेने नटलेला आहेपॅकिंग बॅग भरा आणि निसर्गरम्यसोप्या तरीही साहसी ट्रेकला चला.
वाहतुकीची सोय म्हापसा रेसिडेन्सी आणि मडगाव रेसिडेन्सीपासून सकाळी अनुक्रमे 7.30 आणि 7.15 वाजतातरपणजी येथून सकाळी 8.30 वाजता करण्यात आली आहेजुना गोवाबाणस्थरी आणि सांखली येथूनही वाहतुकीचीसोय ठेवण्यात आली आहे.

इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपड्यांचा एक जादा जोडरेनीवेयरट्रेकिंग शूजखाद्यपदार्थदुर्बीण आणावीधूम्रपानआणि मद्यपानास परवानगी नाही.

यासाठीचे शुल्क प्रती व्यक्ती 800 रुपये असून त्यात जेवणप्रवास आणि गाइडच्या खर्चाचा समावेशआहे.

कृपया नोंद घ्यावी – शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनी हा ट्रेक करू नये.

आरक्षणासाठी संपर्क : श्रीफ्रॅन्सन - 9130254827/9823270967
श्रीअनिल दलालजीटीडीसी – 9422057704 व्हॉट्स अप क्रमांक)
ऑनलाइन आरक्षणासाठी - goa-tourism.com

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...