Tuesday, July 16, 2019

प्रेस रीलीज

प्रेस रीलीज

जीटीडीसीचा पुढील पावसाळी ट्रेक रविवार 21 जुलै 2019 रोजी चर्वाणे धबधबा येथे


पणजी, 16 जुलै – या रविवारी गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसीचर्वाणेधबधबा येथे ट्रेकचे आयोजन केले असून हा धबधबा सत्तारी तालुक्यातील प्रमुखआकर्षणांपैकी एक आहे.



 चर्वाणे धबधब्याचा हा ट्रेक एकूण 8 किलोमीटर्सचा असून दरम्यान निसर्गरम्यलँडस्केप्स पाहायला मिळतातत्याशिवाय वेगवेगळे धबधबे या परिसराचं सौंदर्यवाढवत असतात.
हा ट्रेक साहसी तरीही सहज जमण्यासारखा आहेट्रेकदरम्यान नितळ पाण्याचे झरे,फुलपाखरे आणि एकंदर निसर्ग पाहातो येतोया ट्रेकमध्ये काही ठिकाणी तीव्र उतार,तर काही ठिकाणी निसरड्या खडकांचा थरार अनुभवायला मिळतो.
तेव्हा तुमची ट्रेकिंग बॅग भरा आणि या सोप्य तरीही साहसी ट्रेकदरम्यान निसर्गाचीजादू अनुभवण्यासाठी चला.
हा ट्रेक सर्वांसाठी विशेषतः साहस आणि निसर्गप्रेमींसाठी खुला आहे.
वाहतुकीची सोय म्हापसा रेसिडेन्सी आणि मडगाव रेसिडेन्सीपासून सकाळी अनुक्रमे7.30 आणि 7.15 वाजतातर पणजी येथून सकाळी 8.30 वाजता करण्यात आली आहे.जुना गोवाबाणस्थरी आणि सांखली येथूनही वाहतुकीची सोय ठेवण्यात आली आहे.


इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपड्यांचा एक जादा जोडरेनीवेयरट्रेकिंग शूजखाद्यपदार्थ,दुर्बीण आणावीधूम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.

यासाठीचे शुल्क प्रती व्यक्ती 800 रुपये असून त्यात जेवणप्रवास आणि गाइडच्याखर्चाचा समावेश आहे.

कृपया नोंद घ्यावी – शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनी हा ट्रेक करू नये.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...