Thursday, July 4, 2019

सदानन्नूनडिपे’ ह्या तेलगु सिनेमाच्या रेकॉर्डिंगवेळी भेटले बर्थडे ट्विन्स अरमान मलिक-सावनी रविंद्र



सुरेल गायिका सावनी रविंद्र आणि बॉलीवुडचा सुप्रसिध्द गायक अरमान मलिक ह्यांनी नुकतंच सदानन्नू नडिपे ह्या तेलगु चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. तेव्हा अरमान मलिक हा सावनी रविंद्रचा 'बर्थडे ट्विन्स' असल्याचा उलगडा सावनीला झाला. आणि मग त्यांची भेट अविस्मरणीय झाली.
सावनी रविंद्रने तमिळ सिनेसृष्टीत 20हून अधिक गाणी गायल्यावर आता ती सदानन्नूनडिपे मधून पहिल्यांदाच तेलगु सिनेमामध्ये गाणे गायले आहे. ह्या सिनेमात पार्श्वगायनाची संधी कशी मिळाली, ह्याचा किस्सा सावनी सांगते, नान सोलवा हे गाणे मी संगीतकार शुभंकर शेंबेकर सोबत गायले आहे. हे तमिळ गाणे सदानन्नूनडिपे ह्या तेलगु सिनेमाच्या निर्मात्यांनी ऐकल्यावर त्यांनी शुभंकरला असे एक गाणे ह्या सिनेमासाठीही संगीतबध्द करायचा आग्रह धरला. आणि ते गाणे ही मी आणि शुभंकरनेच गायला हवे, असाही त्यांचा आग्रह होता.

अरमान मलिकशी झालेल्या भेटीसोबत सावनी रविंद्र सांगते, शुभंकर आणि माझ्या डुएट गाण्याशिवायही एक सोलो गाणे ह्या सिनेमासाठी मी गायले आहे. ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळीच माझी आणि अरमानची भेट झाली. अरमानचे ही एक सोलो गाणे ह्यामध्ये आहे. अरमानशी झालेल्या पहिल्याच भेटीत आम्ही खूप गप्पा मारल्या. ह्यावेळी आमचा दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येत असल्याचे आम्हांला उमगले.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!

  What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!   Eating healthy and nutritious food can...