Tuesday, November 9, 2021

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर - 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', 15 नोव्हेंबरपासून, सोम.-शनि. संध्या. 7:30 वा.

                            जिने खोदली औरंगजेबाची कबर, 'स्वराज्यसौदामिनी ताराराणी'!


 -15 नोव्हेंबरपासूनसोम.-शनिसंध्या. 7:30 वासोनी मराठीवर!

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहेअशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर 'स्वराज्य सौदामिनी ताराराणीया मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची  अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती  फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनीसंताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनीएक वाघ तर दुसरा सिंहचारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला.

संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती कीमोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागलेतुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का....असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

'स्वराज्य सौदामिनी ताराराणीया मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेअमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेतयासाठी त्यांच्या घोडेस्वारीदांडपट्टातलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या  तालमी सुरू आहेतआपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.

मराठ्यांना धुळीस मिळवायचेभगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचाया ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडलात्याची कबर औरंगाबादेतमुलखातच खोदली गेली.

ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहेव्यक्तिरेखेचा  प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा  सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेप्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावाअसा अभिनय त्यांनी केला आहेइतिहासातला सर्वांत क्रूरसंशयीजुलमीकपटी बादशाह  असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दशजिवंत झाल्याचा भास  त्यांच्याकडे  पाहून होतोत्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे,  म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!

पाहा, 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी', १५ नोव्हेंबरपासूनसोम.-शनि., संध्या:३० वासोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...