सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. रंगीबेरंगी आकाश कंदील, तोरणांच्या माळा, घराबाहेरील विविध रांगोळ्या आणि सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे दीवाळीचा फराळ! सुरेल गळ्याची गायिका योगिता बोराटे हीने यंदा पौष्टीक फराळाचा बेत केला आहे. तिने कॉर्नफ्लेक्स चिवडा आणि ड्रायफ्रूट बर्फी अश्या दोन पौष्टिक फराळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडीओला कमेंट्सद्वारे भरघोस प्रतिसाद दिला आहे.
गायिका 'योगिता बोराटे' या गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' संस्थापिका आहेत. तर त्यांची 'स्वरमेघा म्युझिक' अकॅडमी देखिल आहे. 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. तर याआधी त्यांची 'दिल लगी ये तेरी' आणि 'हम हात जोडे दोनो' ही ओरिजनल हिंदी गाणी प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये देखील त्यांनी संगीत कार्यक्रम केलेले आहेत.
गायिका योगिता बोराटे पौष्टिक फराळाविषयी सांगतात, "आजकाल सगळीकडे जीम, डाइट, व्यायाम आणि पौष्टिक आहाराचा सर्वच जण विचार करताना दिसतात. त्यामुळे मी घरच्या घरी सहज बनवता येईल असा हेल्दी फराळ बनवला. कॉर्नफ्लेक्स चिवडा आणि ड्रायफ्रूट बर्फी हे होन्ही पौष्टीक पदार्थ मी बनवले. हे होन्ही पदार्थ माझ्या मुलीला आणि कुटुंबीयांना फार आवडतात. तुम्ही सुद्धा घरच्या घरी पौष्टीक पदार्थ बनवा, आणि ही दिवाळी आनंदात साजरी करा. सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!''
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST