२२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'इंडियन आयडल मराठी' ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे. अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. अजय-अतुल हे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सुरांची पर्वणी असणार आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST