Tuesday, November 16, 2021

श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

  


मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहेअशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणीया मालिकेतून उलगडणार आहेया मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी :३० वाजताकोल्हापुरातील ताराराणी चौ स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराजइतिहासका जयसिंगराव पवार आणि खासदार डॉअमोल कोल्हेसोनी मराठी चे बिझनेस हेड श्रीअजय भाळवणकर  यांची प्रमुख उपस्थिती लाभली होतीकलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळरोहित देशमुखमित देशमुखयतिन कार्येकरआनं काळे हे उपस्थित होतेमराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहेअशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी  या मालिकेतून  १५  नोव्हेंबरपासून सोम.-शनिसंध्या.  :३०  प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

 

करारी नजरस्पष्ट शब्दोच्चारपहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते हेस्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहेडॉअमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य त्मविश्वासस्वराज्याप्रती अढळ निष्ठास्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहेछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून उलगडणार आहे.

 

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राही आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणेहे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. 'मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतातत्याच हाताने गर्दनही मारू शकतात!' ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे१५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे,  म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणेपहायला विसरू  नका स्वराज्य सौदामिनी ताराराणी , सोम.-शनि.संध्या:३० वाफक्त सोनी मराठी वाहिनीवर. 


प्रमुख उपस्थिती

डॉअमोल कोल्हे - (मालिकेचे निर्माते)

श्रीअजय भाळवणकर - (बिझनेस हेडसोनी मराठी)

उपस्थित कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा

स्वरदा थिगळे - स्वराज्य सौदामिनी ताराराणी 

यतीन कार्येकरऔरंगजेब

संग्राम समेळछत्रपती राजाराम राजे

संताजी घोरपडे - अमित देशमुख

धनाजी जाधव - रोहित देशमुख

हंबीरराव मोहिते - आनंद काळे

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...