सोनी मराठी वाहिनीवरील तुमच्या-आमच्यातली 'कुसुम' या मालिकेत प्रेक्षकांना कुसुम आणि अनुज यांचा विवाह सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारी, आई-वडिलांची काळजी करणारी स्वाभिमानी कुसुम आता अनुज सरनोबत याची बायको होणार आहे. कुसुमची अट अनुजने मान्य केल्याने तिला जपणारा समजुतदार मुलगा अखेरीस तिला मिळाला आहे. कुसुम तिच्या गुणांनी सरनोबतांच्या घरी सगळ्यांची लाडकी झाली आहे. कुसुम अनुज यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरही लग्नाच्या तयारीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. #कुसुमनुज हा हॅशटॅग चाहत्यांनी निवडला असून लग्नासाठी सगळेच उत्सुक आहेत. #कुसुमनुज यांचं लग्न ८ नोव्हेंबर, रात्री ८:३० वा. सोनी मराठीवर बघता येणार आहे.
नक्की पाहा, कुसुम-अनुज विवाह सोहळा, ८ नोव्हेंबर, रात्री ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर .
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST