Wednesday, December 1, 2021

अभिनेता 'माधव देवचके'ने बिग बॉस ३ च्या स्पर्धकांविषयी पहिल्यांदाच मांडले मत


 बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वाची सगळीकडेच खूप चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच दुसरं पर्व गाजवणारा अभिनेता 'माधव देवचके'ने पहिल्यांदाच स्पर्धकांविषयी व बिग बॉसच्या घराविषयी आपले मत मांडले आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून 'माधव देवचके' लवकरच रूपेरी पडद्यावर तुमच्या भेटीला येणार आहे. माधवचे फॅन्स जगभर आहेत. तसेच तो सोशल मीडियावर देखिल ॲक्टीव्ह असतो.


माधव बिग बॉसच्या घराविषयी सांगतो, "मी ६३ दिवस बिबि हाऊसमध्ये होतो. जवळपास दोन वर्ष झाली या गोष्टीला, परंतु मी बिग बॉसच्या घराला खूप मीस करतोय. खूप छान प्रवास होता. त्या घराची एक जादू म्हणजे माणसाचं आयुष्य बदलून जातं. मी स्वतःला नव्याने भेटलो. बि बि हाऊसचं लोकेशन फिल्म सिटीला होतं. त्यामुळे त्या फिल्म सिटीतील सेटवरच्या खूप आठवणी आहेत. माझ्या अनेक मालिकांचे सेटस तिथे होते. त्यामुळे ती जागा माझ्यासाठी लकी आहे."

पुढे तो बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वातील स्पर्धकांविषयी सांगतो, "आता जे ८ कंटेस्टंट राहिलेत ते सगळेच स्ट्रॉंग स्पर्धक आहेत. ते खूप जिद्दीने खेळत आहेत. विशाल निकमचं सांगायचं झालं तर तो समोरच्या टीमशी न भांडता स्वताच्याच टीमशी जास्त भांडतो. आणि त्यामुळे तो कुठेतरी मागे पडतोय. विकास पाटिल हा मास्टर माइंड वाटतो. आणि तो माझ्यामते टॉप ३ मध्ये असेल. मीनल शहा मला खूप लॉयल वाटते. सोनाली पाटिल म्हणजे कोल्हापुरी ठसका. तिला जर तीची मत योग्यरीत्या मांडता आली तर तिचा पुढिल प्रवास सोप्पा होईल."

पुढे तो सांगतो, "मीरा पहिल्या दिवसापासून मनोरंजन करते पण असं वाटतं ती टॉप ५ पर्यंत जाईल. जय दुधाणेबद्दल सांगायचं तर तो रिॲलीटी शो करून आलाय त्यामुळे त्याला माहिती आहे टास्क कसं खेळतात. परंतु लोकांना त्याचा स्वभाव रागिष्ट वाटतो. फक्त त्याने त्याच्या रागावर कंट्रोल केलं तर तो पुढे जाईल. उत्कर्ष शिंदे मला टॉप ५ मध्ये असेल अस वाटतं. गायत्रीला या आठवड्यात हाताला लागलं असल्यामुळे तिला फिजीकली खेळता येत नाही आहे. आता बिग बॉसच्या घरात काय नविन खेळ होत आहेत हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल."


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...