Monday, December 6, 2021

'स्वरमेघा क्रिएशन' प्रस्तुत गायिका 'योगिता बोराटे' यांचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम येणारं लवकरच !


 नाट्यगृह सुरू झाल्यापासून अनेक सांगितीक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. सध्या सिनेमे, नाटकं यांना सुगीचे दिवस आलेत. सुप्रसिद्ध गायिका 'योगिता बोराटे' आणि 'स्वरमेघा क्रिएशन' प्रस्तुत ‘प्रेमरंग’ हा सांगितीक कार्यक्रम लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. त्यांनी प्रेमरंग या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतच शेअर केलं आहे.


गायिका 'योगिता बोराटे' या गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' संस्थापिका आहेत. तर त्यांची 'स्वरमेघा म्युझिक' अकॅडमी देखिल आहे. 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. तर याआधी त्यांची 'दिल लगी ये तेरी' आणि 'हम हात जोडे दोनो' ही ओरिजनल हिंदी गाणी तसेच 'घोर अंधारी रे' हे गुजराती गाणं  प्रसिद्ध आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये देखील त्यांनी संगीत कार्यक्रम केलेले आहेत.  


योगिता ‘प्रेमरंग’ कार्यक्रमाविषयी सांगतात, “प्रेमाचे विविध रंग आहेत आणि याच रंगांचा सुंदररीत्या अन्वेषण करणारा सांगितीक कार्यक्रम म्हणजे प्रेमरंग ! मी स्वरमेघा म्युझिक अकादमी मधून गेली १० वर्ष अनेक वयोगटातील विद्यार्थ्यांना संगिताचे शिक्षण देत आहे. माझ्याकडे चार वर्षापासून ते सिनीयर सीटीझन पर्यंत अनेक जण गाणे शिकण्यासाठी येतात. या अकादमीतील प्रत्येक गायण्याचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना मंचावर सादरीकरण करण्याचे तसेच व्यावसायिकदृष्ट्या संगितक्षेत्रात कशापद्धतीने काम करायचे यासाठी ट्रेन केले जाते.

पुढे त्या सांगतात, 'बिग बॉस' या रिॲलिटी शोचा आवाज असलेले अभिनेते आणि वॉइस ऑवर आर्टिस्ट 'विजय विक्रम सींग' हे 'प्रेमरंंग' या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. 'स्वरमेघा क्रिएशन'च्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं. हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. मी आशा करते की तुम्ही प्रेमरंग या सांगितीक कार्यक्रमाचा आस्वाद १२ डिसेंबर रोजी, ११ वाजता, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात जाऊन नक्की घ्याल.”



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

A FLEA BY THE TREE: WHERE CULINARY DELIGHTS, BOUTIQUE TREASURES, AND STAR-STUDDED GLAMOUR CAME UNDER ONE ROOF

  A FLEA BY THE TREE: WHERE CULINARY DELIGHTS, BOUTIQUE TREASURES, AND STAR-STUDDED GLAMOUR CAME UNDER ONE ROOF SPEARHEADED BY TEJASWINI KOL...