Friday, December 10, 2021

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी येणार सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल !

 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी येणार सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल !



-'इंडियन आयडल मराठी', १३ आणि १४ डिसेंबररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.



सोनी मराठी वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठीहा कार्यक्रम सुरू होऊन काही आठवडे झाले आहेतप्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहेइंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहेकार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रालिया संस्थेने केली आहेया कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत  वाढते आहेसर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहेया स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाने आणि गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंयग्रँड प्रिमिअरचा आठवडा दणक्यात झाल्यावर या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठीस्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठीत्यांचं कौतुक करण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून  येणार आहेतयावेळी त्यांना घरी परत आल्यासारखं वाटलं असं त्या म्हणाल्या.

   अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदीतमीळउडियानेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे.१९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातल्या एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचं पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झालंत्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आलीतेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे चार दशके चित्रपटगीतेभावगीते आणि भजने यांचे गायन ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून त्या  करताहेतअनुराधा पौडवाल यांचा वरदहस्त स्पर्धेच्या वाटचालीच्या सुरुवातीला लाभणं ही स्पर्धकांसाठी भाग्याची गोष्ट ठरली आहेज्यांच्या आवाजाने भक्तिरसात तल्लीन व्हायला होतं अशा लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या येण्यानं 'इंडियन आयडल मराठीह्या मंचाच्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.

 

   फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रालिनिर्मित 'इंडियन आयडल मराठीहा कार्यक्रम आणि त्यात अनुराधा पौडवाल यांना नक्की बघा.

पाहा, 'इंडियन आयडल मराठी', १३ आणि १४ डिसेंबररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...