Monday, December 13, 2021

तुमची मुलगी काय करते?' - २० डिसेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.

 

तुमची मुलगी काय करते?’  सोनी मराठी वाहिनीवर सुरू होते आहे नवीन थरारक मालिका - २० डिसेंबरपासूनसोम.-शनिरात्री १० वा.

 

      आपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारीही आईची दोन रुपंमुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही करायला तयार असणारी आई आणि तिची रूपं  'तुमची मुलगी काय करतेया मालिकेत पाहायला मिळणार आहेस्वतः ला झालेला त्रास आई एकवेळेस सहन करेलही पण तिच्या मुलांच्या वाटेला कोणी गेलं तर ती वाघीण व्हायला देखील मागेपुढे बघणार नाही.

 

आपल्या मुलासाठी जिवाची बाजी लावून गड उतरलेली हिरकणी असो किंवा स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांना धडे देणाऱ्या जिजामाता असोआईचं अस्तित्व तिच्या मुलासाठी नेहमीच कवच बनलं आहेअसच जेव्हा स्वतः च्या मुलीचा जीव धोक्यात आहे हे समजत तेव्हा एक आई दूर्गेच रूप धारण करून असुरांचा नाश करण्याची शपथ घेते तेव्हा पुन्हा सिद्ध होतं की आई मुलासाठी काहीही करू शकतेएक शिक्षिकाएक कर्तव्यदक्ष आई आणि स्वतःच्या मुलीच्या जीवावर बेतल्याने वाघीण झालेली आई या अशा धाडसी भूमिकेत मधुरा दिसणार आहे२० डिसेंबरपासूनसोम.-शनिरात्री १० वाप्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे.

 


   आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी आणणारी सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच थरार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘तुमची मुलगी काय करते या मालिकेचे कथा-पटकथा लेखन अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकरतर संवाद लेखिका मुग्धा गोडबोले लिहीत असल्याने ते संवाद मनाला भिडणारे असतील यात शंका नाहीपहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी अशा प्रकारची एक थरारक मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेमालिकेची निर्माती मनवा नाईक असूनराष्ट्रीय पुरस्कार विजते दिग्दर्शक भीमराव मुडे मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

 

   उत्तम निर्मातीअनुभवी दिग्दर्शकलोकप्रिय लेखक आणि उत्कृष्ट कलाकार यांचे मिश्रण असलेली ‘तुमची मुलगी काय करते ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर लवकरच बघायला मिळणार आहेपाहा, 'तुमची मुलगी काय करते२० डिसेंबरपासूनसोम.-शनिरात्री १० वाआपल्या सोनी मराठीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...