Friday, December 17, 2021

MRUNALTAI KARANDAK ONE ACT PLAY COMPETITION STORY

 पुन्हा नव्या जोमाने 'मृणाल ताई करंडक' स्पर्धेतून नवीन दिशा



एकांकिका विश्व आता पुन्हा उभं राहत आहे. एकांकिका स्पर्धाना पुन्हा नव्याने नव्या जोमाने सुरुवात झाली असून, मृणाल ताई करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची घोषणा नुकतीच झाली आहे. एकांकिका विश्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या एकांकिका स्पर्धेपैकीं एक अशी ही स्पर्धा अल्पावधीत एकांकिका कलाकारांची आवडती स्पर्धा ठरली आहे.


                                                        हौशी आणि होतकरू नाट्यकर्मींना या एकांकिका स्पर्धेद्वारे एक हक्काचं आणि आपलं व्यासपीठ दिले जात आहे. एकांकिकांच्या माध्यमातून अनेक कलाकार घडले आहेत आणि घडतही आहेत, याच प्रक्रियेत आपलाही हातभार असावा म्हणून सोहम थिएटरन ही२०१७ पासून या स्पर्धेला सुरुवात केली आहे. स्पर्धेला या २ वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृह बंद असल्यामुळे अर्धविराम लागला होता पण आता मोठ्या विश्रांतीनंतर नाट्यगृह पुन्हा सुरु होताच या स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरीच्या तारखा स्पर्धेचे आयोजक असेलल्या सोहम थिएटर्सचे सुदेश सावंत यांनी जाहीर केल्या आहेत. यंदाच्या वर्षी स्पर्धेची प्राथमिक फेरी ही २० जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान केशव गोरे स्मारक येथे होणार असून स्पर्धेची अंतिम फेरी २४ जानेवारीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे पहिल्या दोन सत्रात होणार आहे. २०१९ला झालेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ६० स्पर्धक संस्थानी सहभाग घेतला होता. तर २ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यंदा स्पर्धेला अजून चांगला प्रतिसाद मिळेल असे आयोजकाना वाटते. मृणाल ताई नाट्यकरंडक' या एकांकिका स्पर्धेत प्रथम येणाऱ्या एकांकिकेला रोख रक्कम  ३१,०००/- आणि मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. तसेच द्वितीय आणि लक्षवेधी एकांकिकांना अनुक्रमे २१,०००/- व ११,०००/- आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. त्याचबरोबर अनेक वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजक सुदेश सावंत - ९८२१३५५२६४ समन्वयक संतोष वाडेकर- ८७७९९०४१९३ गिरीश सावंत ९८६७४४४४९८ याना संपर्क करावा.   



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...