Thursday, December 16, 2021

'इंडियन आयडल मराठी' या मंचावर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम येणार!


 सोनी मराठी वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठीहा कार्यक्रम सुरू झाला आणि प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिलीइंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहेकार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रालिया संस्थेने केली आहेया कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहेसर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहेहे स्पर्धक रसिकांच्या कौतुकास पात्र ठरताहेत.  दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यंदाच्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत.

 

   १९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'विधाताया चित्रपटातली 'सात सहेलियां खडी खडीहे गाणे गाऊन साधना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतंत्यांनी आत्तापर्यंत ३४ भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहे. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई या गीताने ९० च्या दशकात धूम केली होतीहे गीत गाणाऱ्या साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता, ‘मैं तेरी मोहोब्बत में, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार आणि ‘नीले नीले अंबर पर या गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधना या मराठी मुलीने तब्बल ३४ भाषांत गीतं गायलीकल्याणजी-आनंदजी जोडीपासून आररहमानपर्यंत प्रत्येकानी त्यांचं कौतुक केलंउदित नारायण यांच्याबरोबर 'जो जीता वही सिकंदरया सिनेमातलं गाजलेलं गाणं ‘पहला नशा पहला खुमार गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम या 'इंडियन आयडल मराठीया मंचावर स्पर्धकांचं मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.

 

   फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रालिनिर्मित 'इंडियन आयडल मराठीहा कार्यक्रम आणि साधना सरगम यांना नक्की बघा.

पाहा, 'इंडियन आयडल मराठी', २० आणि २१ डिसेंबररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...