Tuesday, December 21, 2021

महेश मांजरेकरांच्या हस्ते लकडाऊनच्या पोस्टरचे अनावरण



मराठी चित्रपट सृष्टीला आता पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. मराठी चित्रपटाचा एकूणच प्रेक्षक वाढला असून आता अनेक चित्रपट मनोरंजन सृष्टीला उभारी देण्यासाठी येत आहे. त्यातील एक महत्वाचा चित्रपट म्हणजे 'लकडाऊन'. बहुचर्चित असलेलय या सिनेमाचं पोस्टरचे अनावरण नुकतेच बिग बॉस मराठीच्या मंचावर झाल. या पोस्टरचे अनावरण मनोरंजन सृष्टीचा महत्वाचा भाग असलेले आणि बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर याच्या हस्ते झाल. बिग बॉसच्या मंचावर चित्रपटाच्या पोस्टर अनावरण करत असताना चित्रपटाच्या संपूर्ण टीमच अभिनंदन करत चित्रपटाच्या वाढचालीस महेश मांजरेकरांनी शुभेच्छा दिल्या.

  
 अंकुश आणि प्राजक्ता यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट येत्या नव वर्षात २८ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राला एक नवीन जोडी मिळणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता जरी नवरा नवरीच्या वेशात असले तरी लग्न होतंय की नाही हा एक प्रश्न सगळ्यांचं पडतो. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे पहिल्या लॉकडाऊनमध्ये झाले आहे. चित्रपटाच्या या पोस्टर मध्ये अनेक कलाकार दिसत असून हा चित्रपट कलाकारांनी संपूर्ण असा कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...